'या' तीन फलंदाजांनी वाढदिवस साजरा केला त्रिशतकाने! दोन भारतीय फलंदाजांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 02:51 PM2017-10-10T14:51:29+5:302017-10-10T14:53:10+5:30

क्रिकेटमध्ये त्रिशतक ही फार अवघड बाब! मोजक्याच फलंदाजांना तो टप्पा गाठता येतो आणि त्यातही वाढदिवसाच्या दिवशी त्रिशतक झळकावणे ही तर अगदीच दुर्मिळ गोष्ट.

'These' three batsmen celebrated birthdays! Participation of two Indian batsmen | 'या' तीन फलंदाजांनी वाढदिवस साजरा केला त्रिशतकाने! दोन भारतीय फलंदाजांचा सहभाग

'या' तीन फलंदाजांनी वाढदिवस साजरा केला त्रिशतकाने! दोन भारतीय फलंदाजांचा सहभाग

Next
ठळक मुद्देक्रिकेटमध्ये त्रिशतक ही फार अवघड बाब! मोजक्याच फलंदाजांना तो टप्पा गाठता येतो आणि त्यातही वाढदिवसाच्या दिवशी त्रिशतक झळकावणे ही तर अगदीच दुर्मिळ गोष्ट. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ २१२ त्रिशतकं फळ्यावर लागली आहेत आणि फक्त तीनच फलंदाज असे आहेत की ज्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्रिशतक झळकावले आहे.

- ललित झांबरे

क्रिकेटमध्ये त्रिशतक ही फार अवघड बाब! मोजक्याच फलंदाजांना तो टप्पा गाठता येतो आणि त्यातही वाढदिवसाच्या दिवशी त्रिशतक झळकावणे ही तर अगदीच दुर्मिळ गोष्ट. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ २१२ त्रिशतकं फळ्यावर लागली आहेत आणि फक्त तीनच फलंदाज असे आहेत की ज्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्रिशतक झळकावले आहे. या तीन पैकी दोन फलंदाज भारतीय आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची बाब. इंग्लंडचे कॉलिन काऊड्रे आणि भारताचे रमण लांबा व प्रशांत चोप्रा हे ते विशेष त्रिशतकवीर. 

हिमाचल प्रदेशच्या प्रशांत चोप्राने ७ ऑक्टोबर रोजी रणजी सामन्यात धर्मशाला येथे पंजाबविरुद्ध ३३८ धावांची खेळी केल्याने हा विक्रम समोर आला. त्या दिवशी प्रशांतचा २५ वा वाढदिवस होता आणि हिमाचलसाठी पहिला त्रिशतकवीर बनून त्याने तो स्पेशल बनवला. 

२२ वर्षांपूर्वी दिल्लीचा डॅशिंग फलंदाज रमण लांबाने असाच आपला ३५ वा वाढदिवस स्पेशल बनवला होता. रमणची जन्मतारीख २ जानेवारी १९६० आणि २ जानेवारी १९९५ रोजी त्याने  दिल्ली येथे हिमाचल विरुद्धच्या रणजी सामन्यात दिल्लीसाठी ३१२ धावांची खेळी केली होती. दुर्देवाने रमण त्यानंतर फारसे वाढदिवस साजरे करू शकला नाही. क्रिकेटच्या मैदानावरच चेंडू लागल्याने  १९९८ मध्ये त्याचे निधन झाले.

भारतात जन्मलेले आणि इंग्लंडच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाणारे सर कॉलीन काऊड्रे हे या अतिविशेष पंक्तीतील पहिले फलंदाज. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतकांच्या शतकांचा टप्पा पार केला असला तरी २४ डिसेंबर १९६२ रोजी त्यांनी दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडिलेड येथे झळकावलेले त्रिशतक अद्वितीय ठरले कारण त्यादिवशी त्यांचा ३० वा वाढदिवस होता. आणि या दिवशी त्यांनी ३०७ धावांची खेळी करत आपला वाढदिवस त्रिशतकाने साजरा केला.

सर काऊड्रे यांच्या या शतकाबद्दल आणखी एक विशेष बाब ही की यानंतर त्यांनी कित्येक वर्ष ‘एमसीसी ३०७’  या विशेष क्रमांकाची कार चालवली. यामागचे वैशिष्टय असे की त्यांचे नाव होते मायकेल कॉलिन काऊड्रे. या नावाची इंग्रजी आद्याक्षरे घेतली तर ‘एमसीसी’ आणि त्यांची सर्वोच्च खेळी होती ती या ३०७ धावांची. म्हणून ‘एमसीसी ३०७’. 

तर अशा या अतिविशिष्ट फलंदाजांमध्ये आपल्या देशातले दोन फलंदाज आहेत ही आपल्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. 
 

Web Title: 'These' three batsmen celebrated birthdays! Participation of two Indian batsmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.