IPL 2019 Final, MI VS CSK Live Update, Mumbai Indians VS chennai supper kings match Score, Highlights, In Marathi: Who will win fourth time IPL cup... Mumbai Indians or Chennai Super Kings | IPL 2019 Final, MI VS CSK : जसप्रीत बुमरा ठरला मॅन ऑफ द मॅच
IPL 2019 Final, MI VS CSK : जसप्रीत बुमरा ठरला मॅन ऑफ द मॅच

हैदराबाद, आयपीएल 2019 : भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलचे जेतेपद पटकावले.  मुंबईने चेन्नईपुढे विजयासाठी १५० धावांचे आव्हान ठेवले होते. वॉटसनचा अपवाद वगळता एकाही चेन्नईच्या फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे मुंबईला चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावता आले.

12:20 AM

जसप्रीत बुमरा ठरला मॅन ऑफ द मॅच 

12:20 AM

सर्वोत्तम झेल पुरस्कार

मुंबईच्या कायरन पोलार्डला बेस्ट कॅच हा पुरस्कार देण्यात आला.

11:37 PM

मुंबईने फक्त एका धावेने आयपीएल जिंकली 

11:28 PM

अर्धशतकवीर शेन वॉटसन आऊट

अर्धशतकवीर शेन वॉटसन अखेरच्या षटकामध्ये आऊट झाला.  शेन वॉटसनने ८० धावांची खेळी साकारली. 

11:20 PM

चेन्नईला पाचवा धक्का 

11:04 PM

शेन वॉटसनचे अर्धशतक 

10:44 PM

चेन्नईला मोठा धक्का

महेंद्रसिंग धोनीच्या रुपात चेन्नईला मोठा धक्का बसला. यावेळी धोनी दोन धावांवर धावचीत झाला. 

10:34 PM

अंबाती रायुडू आऊट

रायुडूच्या रुपात चेन्नईला तिसरा धक्का बसला. रायुडूला एका धावेवर समाधान मानावे लागले. 

10:22 PM

सुरेश रैना आऊट

सुरेश रैनाच्या रुपात चेन्नईला दुसरा धक्का बसला. रैनाला आठ धावा करता आल्या.

09:50 PM

सलामीवीर फॅफ ड्यू प्लेसिस आऊट

चेन्नईचा सलामीवीर फॅफ ड्यू प्लेसिस २६ धावांवर बाद झाला. 

09:19 PM

मुंबईचे चेन्नईपुढे १५० धावांचे आव्हान 

09:15 PM

मिचेल मॅक्लेघन आऊट

मिचेल मॅक्लेघन अखेरच्या षटकात एकही धाव न काढता बाद झाला. 

09:07 PM

राहुल चहर शून्यावर बाद 

09:06 PM

हार्दिक पंड्या आऊट

हार्दिक पंड्याच्या रुपात मुंबईला मोठा धक्का बसला. पंड्याला १६ धावा करता आल्या. 

08:42 PM

इशान किशन आऊट

इशान किशनच्या रुपात मुंबईला पाचवा धक्का बसला. इशान किशनला २९ धावा करता आल्या. 

08:34 PM

कृणाल पंड्या आऊट

कृणाल पंड्याच्या रुपात मुंबईला चौथा धक्का बसला. कृणालला सात धावाच करता आल्या. 

08:26 PM

सूर्यकुमार यादव आऊट

सूर्यकुमार यादवच्या रुपात मुंबईला तिसरा धक्का बसला. इम्रान ताहिरने सूर्यकुमार यादवला १५ धावांवर बाद केले. 

08:15 PM

मुंबईची संयत सुरुवात

धडाकेबाज सुरुवातीनंतर मुंबईचे रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक बाद झाले. त्यामुळे ९ षटकांमध्ये मुंबईची २ बाद ५८ अशी स्थिती होती.

08:01 PM

पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सने दोन फलंदाज गमावून 45 धावा केल्या होत्या. 

07:58 PM

चांगल्या सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्सचे दोन्ही सलामीवीर मागोमाग तंबूत परतले. दीपक चहरने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला ( 15)  माघारी पाठवले. महेंद्रसिंग धोनीनं यष्टिमागे त्याचा झेल टिपला.

07:58 PM

रोहित शर्माच्या रुपात मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला. दीपक चहरने रोहितला बाद केले. रोहितला १५ धावा करता आल्या. 

07:55 PM

क्विंटन डीकॉक आऊट

चेन्नईचा वेगवान शार्दुल ठाकूरने क्विंटनला डीकॉक आऊट करत मुंबईला पहिला धक्का दिला. 

07:47 PM

डीकॉकचे खणखणीत चीन षटकार

दीपक चहारच्या तिसऱ्या षटकात डीकॉकने तब्बल तीन षटकार लगावले   

07:44 PM

रोहितची दमदार सुरुवात

रोहितने शार्दुल ठाकूरच्या दुसऱ्याच षटकात सिक्सर लगावला. फायनलमधला हा पहिला सिक्सर ठरला. 

07:02 PM

मुंबईची पहिली बॅटींग

आयपीएलच्या अंतिम फेरीत नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने लागला. मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

06:32 PM

यंदाची आयपीएल कोण जिंकेल... 


Web Title: IPL 2019 Final, MI VS CSK Live Update, Mumbai Indians VS chennai supper kings match Score, Highlights, In Marathi: Who will win fourth time IPL cup... Mumbai Indians or Chennai Super Kings
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.