भारतीय क्रिकेट पंढरीचा ऐतिहासिक क्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 02:33 AM2017-11-12T02:33:31+5:302017-11-12T02:33:58+5:30

भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईने गुरुवारी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये ऐतिहासिक टप्पा पार केला. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेत ५००वा सामना खेळणारा पहिला संघ म्हणून मुंबईने मान मिळविला.

The historic moment of Indian cricket Pandharpur | भारतीय क्रिकेट पंढरीचा ऐतिहासिक क्षण

भारतीय क्रिकेट पंढरीचा ऐतिहासिक क्षण

- रोहित नाईक

भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईने गुरुवारी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये ऐतिहासिक टप्पा पार केला. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेत ५००वा सामना खेळणारा पहिला संघ म्हणून मुंबईने मान मिळविला. मुंबई आणि क्रिकेट यांचे वेगळेच समीकरण आहे. मुंबईचा देशातील क्रिकेटमध्ये इतका दबदबा आहे की, समोर मुंबईचा संघ असल्यास प्रतिस्पर्धी संघ आधीच मानसिकरीत्या ‘बॅकफूट’वर गेलेला असतो. कारण कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची मुंबईकरांची वृत्ती, भारतीय क्रिकेटमध्ये ‘खडूस’ या नावाने ओळखली जाते.
५००व्या ऐतिहासिक रणजी सामन्याच्या निमित्ताने अनेक दिग्गजांनी मुंबई क्रिकेटच्या आठवणींना उजाळा दिला. मुळात मुंबई संघात स्थान मिळविणे, हेच क्रिकेटपटूंसाठी मोठे दिव्य असते. तब्बल ४१ वेळा रणजी चषक पटकावताना मुंबईने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. इतर संघांनी मिळविलेले जेतेपद एका बाजूला आणि एकट्या मुंबईचे जेतेपद एका बाजूला ठेवले, तरी मुंबई वरचढ ठरेल. दखल घेण्याची बाब म्हणजे, इतके मोठे यश मिळवूनही मुंबईच्या जेतेपदांची भूक काही कमी होत नाही. जेतेपद मिळविण्यापेक्षा ते टिकविणे खूप कठीण असते आणि मुंबईने हीच बाब यशस्वीपणे कायम राखली. त्यामुळेच मुंबईकर रणजी क्रिकेटमध्ये नेहमी अग्रेसर राहिले आहेत.
विजय मर्चंट, पॉली उम्रीगर, माधव आपटे, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, अमोल मुझुमदार, अजित आगरकर, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, झहीर खान, आदित्य तरे, पृथ्वी शॉ अशी खूप मोठी फळी मुंबईने भारतीय क्रिकेटला दिली. ७० हून अधिक खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले, हे विशेष.
स्वातंत्र्यपूर्व काळात ‘बॉम्बे’ नावाने ओळखल्या जाणाºया मुंबईकरांनी १९३४-३५ साली रणजी स्पर्धेच्या पहिल्या सत्राचे जेतेपद पटकावले आणि त्यानंतर आतापर्यंत सर्वाधिक ४१ जेतेपदे मुंबईने मिळविली. विशेष म्हणजे, यामध्ये १९५८-५९ ते १९७२-७३ अशी सलग १५ जेतेपदांची विक्रमी माळ मुंबईने गुंफली. यावरूनच मुंबईच्या वर्चस्वाची कल्पना येते. याच कारणामुळे कोणताही संघ मुंबईचा सामना करण्याआधी अनेकदा विचार करतो. एवढेच कशाला, १९९७-९८ साली भारत दौºयावर आलेल्या बलाढ्य आॅस्टेÑलियाला तीन दिवसीय सराव सामन्यात सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात मुंबईने १० विकेट्स राखून पाणी पाजले होते. सचिनने पहिल्या डावात नाबाद २०४ धावांचा तडाखा देत, कांगारूंना मुंबईचे पाणी पाजले होते.
मुंबईने क्रिकेट विश्वाला लिजेंड क्रिकेटपटू दिले आहेत. मुंबईच्या चिवट खेळाची अनेक उदाहरणे देता येतील. त्यातील एक म्हणजे, २००६मध्ये अमोल मुझुमदार कर्णधार असताना, मुंबईची उपांत्य फेरीत दुसºया डावात शून्यावर ५ बाद अशी केविलवाणी अवस्था झाली होती. त्यातूनही विनायक सामंतने झुंजार ६६ धावांची खेळी करून संघाला अंतिम फेरीत नेले होते.
माजी कर्णधार सुधीर नाईक यांनी सांगितले की, ‘१९७०-७१च्या मोसमातील अंतिम सामन्यात मुंबईचे सर्व नावाजलेले खेळाडू विंडिज दौºयासाठी भारतीय संघासोबत गेले होते. त्या वेळी कर्णधार म्हणून माझी निवड झाली होती. अंतिम सामना फॉर्ममध्ये असलेल्या महाराष्ट्राविरुद्ध होता. पहिल्यांदाच कर्णधार झालेला आणि संघात पॅडी शिवलकर, अब्दुल इस्माईल हे गोलंदाज होते. महाराष्ट्र भक्कम स्थितीत असतानाही, केवळ गोलंदाजांच्या जोरावर आम्ही बाजी मारताना, महाराष्ट्राच्या जेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळविले होते.’ तसेच कर्नल दिलीप वेंगसरकर यांनी एक भन्नाट आठवण सांगितली की, ‘मुंबईच्या वर्चस्वाची दखल कपिल देवसारख्या महान खेळाडूनेही घेतली होती. १९९०-९१च्या रणजी अंतिम सामन्यात हरयाणाविरुद्ध आमचा विजय जवळपास निश्चितच होता आणि हरयाणाचा कर्णधार कपिलने विनवणी केली होती की, एकदा तरी आम्हाला जिंकू द्या!’

Web Title: The historic moment of Indian cricket Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.