इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय - मराठी, घटक- वचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:21 AM2019-01-21T10:21:22+5:302019-01-21T10:30:29+5:30

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - लेख क्र. 19 विषय- मराठी, घटक- वचन,महत्त्वाचे मुुद्दे, वचनाचे दोन प्रकार, एकवचन व अनेकवचन

Etc. 5th scholarship exam - subject- Marathi, component- promise | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय - मराठी, घटक- वचन

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय - मराठी, घटक- वचन

googlenewsNext
ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा लेख क्र. 19 विषय- मराठी, घटक- वचन

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - लेख क्र. 19 विषय- मराठी, घटक- वचन

महत्त्वाचे मुुद्दे -

  •  वचनाचे दोन प्रकार, एकवचन व अनेकवचन
  •  एकवचनी सर्वनामे- मी, तू, तो, ती, ते, जो, हा, कोण
  •  अनेकवचनी सर्वनामे- आम्ही, तुम्ही, ते, त्या, ती, जे, ह्या, त्या
  • काही शब्द किंवा नामे ही एकवचन व अनेकवचनात तसेच असतात. उदा. शाळा-शाळा, बाजू-बाजू, घंटा-घंटा, भाषा-भाषा, दिशा-दिशा, पूजा-पूजा, सभा-सभा, आज्ञा-आज्ञा, कन्या-कन्या, माता-माता, शंका-शंका, गायिका-गायिका, नायिका-नायिका, विधवा-विधवा, मैना-मैना, शिक्षिका-शिक्षिका, लेखिका-लेखिका, सोने-सोने, दिवस-दिवस, सैनिक-सैनिक, वाघ-वाघ, कागद-कागद, खडू-खडू, उंदीर-उंदीर, कवी-कवी, लाडू-लाडू, भाऊ-भाऊ, बैल-बैल, डोंबारी-डोंबारी, शिक्षक-शिक्षक, सुतार-सुतार, देश-देश, कवी-कवी, चित्रकार-चित्रकार.
     

नमुना प्रश्न :-

(1) पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम असलेला पर्याय ओळखा (2018)
(1) नशीब (2) गुलाब (3) जबाब (4) हिशेब
स्पष्टीकरण- नशीब उत्तर येईल.

(2) निश्चित अनेकवचनी शब्दाचा पर्याय कोणता?
(1) सून (2) बॅँक (3) सोसायटी (4) वाघ
स्पष्टीकरण- सून-सुना, बॅँक-बॅँका, सोसायटी-सोसायट्या, वाघ-वाघ त्यामुळे वाघ हे निश्चित अनेकवचनी शब्द आहे.

(3) खालील पर्यायांपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.
(1) मळा (2) गोळा (3) खिळा (4) शाळा
स्पष्टीकरण- मळा-मळे, गोळा-गोळे, खिळा-खिळे, शाळा-शाळा असे एकवचन-अनेकवचन शब्द तयार होतील. शाळा चे अनेकवचन शाळा आहे.

(4) खालील पर्यायांतील निश्चित अनेकवचनी शब्द कोणता?
(1) रोग (2) शेंग (3) टांग (4) रांग
स्पष्टीकरण- रोग-रोग, शेंग-शेंगा, टांग-टांगा, रांग-रांगा म्हणून रोग निश्चित अनेकवचन येईल. कारण शेंग, टांग, रांग हे एकवचन आहेत.

(5) खालीलपैकी निश्चित एकवचनी शब्द कोणता?
(1) बंब (2) कोंब (3) पिंप (4) पंप
स्पष्टीकरण- बंब, कोंब, पंप हे एकवचन व अनेकवचनात तसेच राहतात, तर पिंप-पिंपे असे बदल होते.

सोडविण्यासाठी प्रश्न-

(1) एकवचनी शब्दाचा पर्याय कोणता?
(1) दावे (2) मेवा (3) हेलपाटे (4) चावे

(2) खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?
(1) वन (2) ओढा (3) लाटा (4) मन

(3) एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.
(1) पोती (2) दिवे (3) झेंडा (4) पंखे

(4) खालील पर्यायातून एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.
(1) चांदणी (2) जाती (3) जमिनी (4) वेली

(5) खालील पर्यायातून अनेकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.
(1) झाड (2) रोपटे (3) वेली (4) फूल

(6) खालील पर्यायातून एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा
(1) गोळे (2) मुळे (3) तळे (4) डोळे

(7) खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता?
(1) कोळी (2) मोळी (3) गोळी (4) टोळी

(8) खालीलपैकी अनेकवचनाची चुकीची जोडी कोणती?
(1) सोने-सोने (2) कवी-कवी (3) गोळी-गोळी (4) कोळी-कोळी

(9) खालीलपैकी वचनानुसार वेगळा कोण?
(1) पूजा-पूजा (2) बहीण-बहीण (3) भाऊ-भाऊ (4) सुतार-सुतार

(10) वचनानुसार चुकीचा पर्याय कोणता?
(1) वाघ-वाघ (2) बाजू-बाजू (3) माता-माते (4) कागद-कागद

(11) वचनानुसार बरोबर पर्याय निवडा.
(1) शंका-शंके (2) शिक्षक-शिक्षके (3) शाळा-शाळे (4) उंदीर-उंदीर

(12) खालीलपैकी निश्चितपणे अनेकवचनी पर्याय कोणता?
(1) मैना (2) सुना (3) दाणा (4) कणा

(13)‘दगड’ या शब्दासाठी अनेकवचनी योग्य शब्द कोणता?
(1)दगडे (2) दगडी (3) दगड (4) यापैकी नाही

(14) खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?
(1) पूल (2) माळ (3) झाड (4) मूल

(15) खालील पर्यायातील एकवचनी शब्द ओळखा.
(1) पेढे (2) वेडे (3) खेडे (4) रेडे

उत्तरसूची :-
(1) 1 (2) 3 (3) 3 (4) 1 (5) 3 (6) 3 (7) 1 (8) 3 (9) 2 (10) 3 (11) 4 (12) 2 (13) 3 (14) 1 (15) 3
 

Web Title: Etc. 5th scholarship exam - subject- Marathi, component- promise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.