Etc. 5th scholarship exam, subject-Marathi, component- junket words | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक- जोडशब्द
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक- जोडशब्द

ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 29विषय-मराठी, घटक- जोडशब्द

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 29, विषय-मराठी, घटक- जोडशब्द

 • काही शब्दांची पुनरावृत्ती होऊन जोडशब्द तयार होतो. उदा. आरडाओरडा, कडकडाट, धाडधाड आदी.
 •  काहीवेळा पहिल्या शब्दाच्या अर्थाचाच शब्द जोडून येतो.

उदा. ऐसपैस, कावराबावरा, चारापाणी आदी.

काही जोडशब्द :

 •  गोरामोरा, चालढकल, क्रियाकर्म, कज्जेखटले, टक्केटोणपे, अर्धामुर्धा, चीजवस्तू, ताळतंत्र, बेलभांडार, रोगराई, तोळामासा, थकबाकी, दानधर्म, दाणापाणी, धष्टपुष्ट, नदीनाला, पानसुपारी, पोरेसोरे, बाजारहाट, बोलभांड, भांडीकुंडी, भीडमुर्वत, मनोमन, मारझोड, मेवामिठाई, रूपरंग, वजनेमापे, व्यापारउदीम, वास्तपुस्त, शेठसावकार, साजशृंगार, हीनदीन, देवादावा, सणवार, शंखशिंपले, पांढराशुभ्र, कामधंदा.
   

नमुना प्रश्न :-

 • पुढील शब्दांपैकी जोडशब्द नसलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा
   

(1) (1) हालहवाल (2) शेतीवाडी (3) पाऊसपाणी (4) मनोमनी
(2) (1) लुळापांगळा (2) भांडणकुंडण (3) शिक्कामोर्तब (4) हीनदीन
(3) (1) भीडभाड (2) धुमधाम (3) नदीनाला (4) हवामान
(4) (1) कामकाज (2) कामधंदा (3) वाडवडील (4) पैसे
(5) (1) साधुसंत (2) मुलेबाळे (3) सटरमटर (4) पाळेमुळे
(6) (1) पाटपाणी (2) चारपार (3) साफसफाई (4) बरेवाईट
(7) (1) गोळमेळा (2) गोळाबेरीज (3) तोळामासा (4) कुजबुज
(8) (1) चुंगचंहाडी (2) गणराज (3) ताळतंत्र (4) चीजवस्तू
(9) (1) काळासावळा (2) आडपडदा (3) कामकाज (4) घरकाम
(10) (1) सहकार (2) मानापान (3) भोळाभाबडा (4) साथसंगत

 •  खालील पर्यायातील जोडशब्द शोधा
   

(11) (1) सभासद (2) सहकार (3) सहमती (4) ओलाचिंब
(12) (1) कांदाभाकरी (2) केरकरा (3) ओढाताळ (4) गोरातोरा
(13) (1) क्रियाकर्म (2) चारमार (3) चीजमूज (4) खबरगोष्ट
(14) (1) घरकाम (2) घरदार (3) घरघर (4) घरबीर
(15) (1) गोरमोर (2) गोरातोरा (3) गोरामोरा (4) गोरागोमटा
(16) (1) खाणावळ (2) आगळावेगळा (3) सहमती (4) सभासद
(17) (1) चालढाल (2) चालमाल (3) चालढकल (4) चालकाल
(18) (1) ताळमेळ (2) ताळकाळ (3) ताळमंत्र (4) काळतंत्र
(19) (1) कच्चीबच्ची (2) चारामारा (3) ओढातोड (4) गोडकडू
(20) (1) साधुसंत (2) हवामान (3) हवावारा (4) वारागारा


उत्तर सूची : - (1) 2 (2) 2 (3) 4 (4) 4 (5) 3 (6) 2 (7) 1 (8) 2 (9) 4 (10) 1
(11) 4 (12) 1 (13) 1 (14) 2 (15) 4 (16) 2 (17) 3 (18) 1 (19) 1 (20) 1
 

जिल्हा परिषद शाळा खरशिंग ता. कवठेमहांकाळ


Web Title: Etc. 5th scholarship exam, subject-Marathi, component- junket words
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.