एक सुंदर, छान, गुटगुटीत आणि स्वस्थ मूल आपल्याला व्हावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते; पण एक आॅटिस्टिक मूल घरात जन्माला आल्यानंतर सुखस्वप्नांचं चित्रच विस्कटून जातं. पंधरा वर्षांपूर्वी असच एक चित्र विस्कटलं आणि सुरू झाला त्या चित्राला सावरण्याचा प्रयत्न.
४ नोव्हेंबर २०११ रोजी टाकळकर दाम्पत्य, पुणे येथील डॉक्टर अमिता पुरोहित, बेळगावचे शंशाक कोणो, नाशिक येथील प्रमोद गायकवाड, तसेच औरंगाबाद येथील मिलिंद कंक आणि काही सामाजिक जाणिवेतून एकत्र आलेल्या अजून काही लोकांनी ‘आरंभ’चा पाया रचला. स्वत:च्या मनात असलेल्या कल्पना आणि इतर पालकांच्या गरजा ओळखून एक अद्ययावत व आधुनिक सेंटर मराठवाड्यात असावं याचा ध्यास घेतला व मराठवाड्यातले पहिले स्वमग्न मुलांसाठीचे केंद्र आरंभच्या स्वरूपात साकार झालं.
स्वत: मी विशेष बी.एड.ची अर्हता प्राप्त केली. या विशेष असणाºया मुलांसाठी लागणारे प्रशिक्षण व अर्हता प्राप्त असणाराच शिक्षकवर्ग मुलांसाठी नेमून दिला. उत्तम दर्जाचे शिक्षण पुरवणे, त्यांना स्वावलंबी बनविणे, समाजात स्वमग्न मुलांविषयी जागृती करून त्या मुलांना विशेष शिक्षण देण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करणे, स्वमग्न मुलांना आयुष्यात उभे करण्याचे कार्य याद्वारे आरंभने हाती घेतले. आज आरंभमध्ये २८ विद्यार्थी आहेत. आरंभ येथे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना आयुष्यात उभे करण्यासाठी खास परिश्रम घेतले जातात. आवाज थेरपी, अ‍ॅक्यू थेरपी, प्ले थेरपी, म्युझिक थेरपी, ड्रामा थेरपी, मास्क थेरपी, स्पिच थेरपी, फिजिओथेरपीद्वारे मुलांच्या क्षमता विकसित करण्यावर भर दिला जातो.
प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी सुप्त गुण असतात. गरज असते ते ओळखण्याची. स्वमग्न मुले जरी सा-या क्षमता लवकर प्राप्त करू शकत नसली तरी त्यांची बुद्धी सामान्य मुलांप्रमाणे असते. त्यांच्यातले सुप्त गुण ओळखून ते प्रत्यक्षात उतरवण्याचे काम आर्ट झोनच्या माध्यमातून आरंभने केले आहे. कला ही प्रत्येकाच्या अंगात सुप्त रूपात दडलेली असतेच. फक्त त्यास वाव मिळण्याचा अवकाश असतो. स्वमग्न (आॅटिस्टिक) मुलांमध्ये जरी त्रिसूत्री अक्षमता असली तरीही त्यांच्यामध्ये एक ना एक सुप्त गुण असतोच. आपणास फक्त तो ओळखून त्यास आकार द्यावा लागतो. ‘आरंभ’ने हेच कार्य हाती घेतले आहे. मुलांमधील कलेला व्यवसायाचे रूप देण्यासाठी, त्यांना भविष्यात स्वावलंबी बनविण्यासाठी आर्ट झोनची स्थापना करण्यात आली.
स्वमग्न मुले जरी सा-या क्षमता लवकर प्राप्त करू शकत नसली तरी त्यांची बुद्धी सामान्य मुलांप्रमाणे असते. त्यांच्यातले सुप्त गुण ओळखून ते प्रत्यक्षात उतरवण्याचे काम आर्ट झोनच्या माध्यमातून आरंभने केले आहे. कला ही प्रत्येकाच्या अंगात सुप्त रूपात दडलेली असतेच. फक्त त्यास वाव मिळण्याचा अवकाश असतो. स्वमग्न (आॅटिस्टिक) मुलांमध्ये जरी त्रिसूत्री अक्षमता असली तरीही त्यांच्यामध्ये एक ना एक सुप्त गुण असतोच. आपणास फक्त तो ओळखून त्यास आकार द्यावा लागतो. ‘आरंभ’ने हेच कार्य हाती घेतले आहे. मुलांमधील कलेला व्यवसायाचे रूप देण्यासाठी, त्यांना भविष्यात स्वावलंबी बनविण्यासाठी ‘आरंभ आर्ट-झोन’ची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये १० वर्षांवरील मुलांना त्यांच्या अंगातील कलागुणांनुसार प्रशिक्षण दिले जाते आणि मग त्यातून सुंदर कलात्मक वस्तूंची निर्मिती केली जाते. समाजात या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करून स्वमग्न मुलांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते.
आरंभचा मुख्य उद्देश हा स्वमग्न मुलांना सामान्य पातळीपर्यंत आणून त्यांच्यातले सुप्त गुण ओळखून फक्त त्यांना आयुष्यातच नव्हे, तर स्वत:च्या पायावर उभे करणे, हा आहे.
शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणारी, पण फक्त शैक्षणिकदृष्ट्या अतिशय कमकुवत असणारी मुले या प्रकारात मोडतात. समाजातील ही गरज ओळखून यावर्षीपासून अध्ययन अक्षमतेचा एक वर्ग ‘आरंभ’मध्ये सुरू करण्यात आला. त्यात सहा मुलं असून, प्रत्येकाला एकास एक पद्धतीने शिकवलं जातं. सर्व मुलांचा प्रवेश सर्वसाधारण शाळेत असून, तयारी आरंभमधून केली जाते. विशेष मुलांच्या विशेष शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ लागते. त्यासाठी ‘आरंभ’ कटिबद्ध आहेच, पण सामाजिक सहभाग मिळाला तर मुलांना अनेक आधुनिक सोयी उपलब्ध होऊ शकतात. गरज आहे समाजातील ती दात्यांनी समोर येण्याची.
- अंबिका टाकळकर


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.