ठळक मुद्देएकलारी येथे कार्यक्रम : रामेश्वर कारेमोरे यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : धकाधकीच्या जीवनात आर्थिक संपन्नता महत्त्वाची आहे. चूल आणि मुल यापर्यंत मर्यादित असलेल्या स्त्रियांना कुटुंबाच्या आर्थिक स्रोतात भर टाकण्यासाठी रोजगार करावा लागत आहे. कुटुंबाची आवक वाढवण्यासाठी महिलांना गावाबाहेर पडावे लागते. यामुळे कुटुंबाची वाताहत होते. महिलांनी शासकीय योजनांतून मिळणारे प्रशिक्षण घेतल्यास लहान मोठे उद्योग गावातच सुरु करून आर्थिक उत्पन्नाचे साधने वाढवता येतील असे प्रतिपादन सरपंच रामेश्वर कारेमोरे यांनी केले.
एकलारी येथे महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा व किरण लोकसंचलित साधन केंद्र वरठीच्या वतीने आयोजित शिवणकला व सौंदर्य प्रशिक्षण मेळाव्यात ते बोलत होते. उदघाटन नवनिर्वाचित सरपंच दशमाबाई गजभिये यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माविम चे मकसूद शेख, गौतम शहरे, नाना फेंडर, विलास ठोंबरे, मिळेश्वर सार्वे, मोनाली बालपांडे, मंगला हटवार, हेमलता गिºहेपुंजे, ताराबाई भूजाळे, पूनम बालपांडे, पोलीस पाटील संतोष बालपांडे, अस्मिता रामटेके, सारंगा आगाशे, विजेता बडगे, भैरवी सार्वे, पूजा सार्वे, कांचन मारवाडी उपस्थित होते. महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा व किरण लोकसंचलित साधन वरठीमार्फत एकलारी येथे महिलांना शिवणकला व सौंदर्य शास्त्राचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.