पवनीतील पर्यटन विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 10:06 PM2018-05-20T22:06:30+5:302018-05-20T22:06:57+5:30

पवनी शहर व तालुक्यात पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील पर्यटनस्थळांना रोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत. शहराचा व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलविण्याची क्षमता येथील पर्यटनात आहेत.

Windy tourist development stalled | पवनीतील पर्यटन विकास रखडला

पवनीतील पर्यटन विकास रखडला

Next
ठळक मुद्देदुर्लक्ष : नियोजनाचा अभाव, रोजगाराच्या संधीलाही ‘खो’

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : पवनी शहर व तालुक्यात पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील पर्यटनस्थळांना रोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत. शहराचा व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलविण्याची क्षमता येथील पर्यटनात आहेत. पर्यटन प्रेमी व युवक वर्ग येथील पर्यटन विकासाकडे नवी दिशा देणारे ‘टुरीजम डेव्हलपमेंट व्हिजन’च्या नजरेने बघत आहे. पण राज्य व केंद्रस्तरावर येथील पर्यटन विकासाकरिता काहीही नियोजन व ‘मार्केटिंग’ नसल्यामुळे पर्यटनाचा विकास झाला नाही.
विदर्भातील सर्वात मोठे महत्वकांक्षी गोसीखुर्द धरण, रूयाड येथील पत्र्त्रा मेत्ता संघ द्वारा निर्मित आंतरराष्ट्रीयस्तराचा महासमाधी महास्तुप, उमरेड, करांडला अभयारण्याचे पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्र शहरातील प्राचीन ऐतिहासिक किल्ला, विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी गणेश मंदिर, धरणीधर गणेश मंदिर, टेंभ्येस्वामी मंदिर, राझीचा गणेश, वैजेश्वर मंदिर आदी पर्यटन स्थळांचा समावेश आहे.
मागील तीन-चार वर्षांपासून पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. रोज मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. पवनी शहराची व तालुक्याची ओळख राज्य व राष्ट्रीय स्तरावर पर्यटनस्थळाच्या रूपात होत आहे. या शहराचा रामटेकच्या धर्तीवर पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास पूर्ण तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून जाईल. त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. शहराचे गतवैभव प्राप्त करून देण्याकरिता पर्यटनक्षेत्राचा विकास करण्याची गरज आहे. शहरात व तालुक्यात पर्यटन वाढीकरिता सर्व काही आहे. पण पर्यटनवाढी करिता काहीही नियोजन झाले नाही. मार्केटिंग नसल्यामुळे राज्य व केंद्रस्तरावर येथील पर्यटनस्थळांना प्रसिद्धी मिळाली नाही. येथील पर्यटन स्थळाला शासनाच्या महत्वाच्या पर्यटन स्थळाच्या यादीत आणणे, विकास करणे, पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देणे आदी विषयी एक पर्यटन विषयक आराखडा तयार करून पाठपुरावा शासनाकडे करणे गरजेचे आहे. पण याकडे पर्यटन विकासाकडे कोणाचेही लक्ष नसल्यामुळे येथील पर्यटन विकास रखडला आहे.

Web Title: Windy tourist development stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.