बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्र प्रकाशात वन्यप्राणी गणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:35 AM2019-05-20T00:35:33+5:302019-05-20T00:35:54+5:30

बुध्द पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात शनिवारी रात्री तालुक्यातील नागझीरा अभयारण्यात निसर्गप्रेमीच्या सहकार्याने वन्यप्राणी गणना करण्यात आली. यावेळी वाघ, बिबट यासह विविध प्राण्यांचे दर्शन झाले. वन्यप्राणी गणनेसाठी ४४ मचानी उभारल्या होत्या. या मोहिमेत ८८ निगर्सप्रेमी सहभागी झाले होते.

Wildlife count in the light moon light of Buddha Purnima | बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्र प्रकाशात वन्यप्राणी गणना

बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्र प्रकाशात वन्यप्राणी गणना

Next
ठळक मुद्देनागझीरा अभयारण्य : ४४ मचाणीवर ८८ निसर्गप्रेमी

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : बुध्द पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात शनिवारी रात्री तालुक्यातील नागझीरा अभयारण्यात निसर्गप्रेमीच्या सहकार्याने वन्यप्राणी गणना करण्यात आली. यावेळी वाघ, बिबट यासह विविध प्राण्यांचे दर्शन झाले. वन्यप्राणी गणनेसाठी ४४ मचानी उभारल्या होत्या. या मोहिमेत ८८ निगर्सप्रेमी सहभागी झाले होते.
वन्यजीव विभागाच्यावतीने शनिवारी वन्यप्राणी गणना आयोजित करण्यात आली होती. साकोली तालुक्यातील नागझीरा अभयारण्यात वन्यप्राणी गणनेची जय्यत तयारी करण्यात आली होती. यात पिटेझरी जंगलात १४ मचान, उमरझरी जंगलात १४ मचाणी व नवेगाव पार्क परिसरात १६ मचाण उभारण्यात आले होते. या मचाणावर वनअधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. बुध्द पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात पाणवठ्यावर विविध वन्यप्राण्यांचे दर्शन झाले. वाघ, बिबट यासह हरिण, चितळ, सांबर, अस्वल, निलगाय, रानकुत्रे, गवे या प्राण्यांसह मोर, लांडोर आदी पक्षांचेही दर्शन झाले. पौर्णिमेची रात्र निसर्गप्रेमींसाठी सुखद अनुभूती देवून गेली. या वन्यप्राण्यांच्या नोंदी वनविभागाला दिल्या असून लवकरच प्राण्यांची अधिकृत संख्या कळेल.

Web Title: Wildlife count in the light moon light of Buddha Purnima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.