प्रतीक्षा बागडे मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:11 PM2018-01-21T23:11:45+5:302018-01-21T23:12:04+5:30

माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली.

Wait for the entrance to the CID to investigate the death of Bagde death | प्रतीक्षा बागडे मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवा

प्रतीक्षा बागडे मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवा

Next
ठळक मुद्देवडिलांची मागणी : पोलीस अधीक्षकांना निवेदन

आॅनलाईन लोकमत
भंडारा : माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली. असा संशय व्यक्त करून या प्रकरणी सखोल चौकशी करून सदर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात यावा अशी मागणी मृत प्रतीक्षा हिचे वडील प्रकाश बागडे यांनी केली आहे. निवेदनात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनानुसार, प्रकाश बागडे यांची प्रतीक्षा (१९) ही मुलगी १३ जानेवारीला शिकवणी वर्गाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. परंतु घरी परतली नाही. वडीलांनी मुलीच्या मोबाईलवर कॉल केला असता एका मुलाने फोन उचलला. वडीलांचा आवाज ऐकताच त्या मुलाने मोबाईल बंद केला. पोलिसांनी मुलगी परत येईल, असे सांगून त्यांना परत पाठविले. वडीलांनी संशयीत युवकांबद्दल माहिती दिली. परंतु चौकशी केली नाही. अन्यथा माझ्या मुलीचा जीव वाचला असता, पोलीस आरोपींना पाठीशी घालत आहेत. हयगय दाखविल्याने पोलीस निरीक्षक सिडाम यांना निलंबित करण्यात यावे, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात यावा अशी मागणी आहे. शिष्टमंडळात प्रकाश बागडे, मनोज बागडे, सचिन घनमारे, अजय मेश्राम, सुहास गजभिये, विक्की बागडे, योगेश बागडे, मनोहर घरडे, रणजित घरडे, मृणाल गोस्वामी, प्रकाश घरडे यांचा समावेश होता.

Web Title: Wait for the entrance to the CID to investigate the death of Bagde death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.