Tusar NP initiative for clean India | स्वच्छ भारतसाठी तुमसर न.प.चा पुढाकार

ठळक मुद्देरॅकींग वाढविण्याचा प्रयत्न : राज्यात १७ व्या तर विभागात आठव्यास्थानी

मोहन भोयर।
आॅनलाईन लोकमत
तुमसर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तुमसर नगरपरिषदेची पुरस्कार प्राप्त करण्याकरिता घोडदौड सुरू असून सध्या तुमसर नगरपरिषद विभागात ८ व्या राज्यात १७ व्या तर देशात ४० व्या क्रमांकावर आहे. भंडारा तथा गोंदिया जिल्ह्यातील एकमेव नगरपरिषद ठरली आहे. १५ ते २५ जानेवारी दरम्यान स्वच्छ सर्वेक्षण पथक येणार आहे.
शहर स्वच्छ व सुंदर असावे असे प्रत्येकाला वाटते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तुमसर नगरपरिषदेने स्पर्धेत यशासाठी सज्ज आहे. नगरपरिषदेने नामांकन दिवसेंदिवस अपग्रेड होत आहे. याकरिता कचऱ्याचा अ‍ॅप तयार करण्यात आला आहे. कचरा पाहून अ‍ॅपवर घातल्यानंतर सहा तासात कचरा उचलावा लागतो. सहा तासात कचरा उचलला गेला तर पॉईन्ट मिळतात. यात नगरपरिषदेची रँक वाढते. १५ ते २५ जानेवारी दरम्यान पथक येणार असून त्या अनुषंगाने स्वच्छतेला प्राधान्य देणे सुरू आहे. याकरिता नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपाध्यक्ष कांचन कोडवानी, मुख्याधिकारी अर्चना मेंढे व सर्व नगरसेवक कामाला लागले आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेचा राष्ट्रीय तथा राज्य स्तरावरचा पुरस्कार प्राप्त करण्याकरिता प्रयत्न सुरू असून यात नक्कीच यश मिळेल. सामूहिक प्रयत्नामुळेच रॅकींग वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-प्रदीप पडोळे, नगराध्यक्ष तुमसर


Web Title: Tusar NP initiative for clean India
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.