तरुणाईमुळे गावाचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:54 PM2018-01-22T23:54:04+5:302018-01-22T23:54:28+5:30

भावी पिढीला तंदुरूस्त करण्यासाठी गावाला स्वच्छ व सुंदर करणे काळाची गरज आहे.

Transplanting of the village due to youth | तरुणाईमुळे गावाचा कायापालट

तरुणाईमुळे गावाचा कायापालट

googlenewsNext
ठळक मुद्देडी. एस. बिसेन : गुंजेपार येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन

आॅनलाईन लोकमत
भंडारा : भावी पिढीला तंदुरूस्त करण्यासाठी गावाला स्वच्छ व सुंदर करणे काळाची गरज आहे. याकरिता दरवर्षी ग्रामस्तरावर घेण्यात येणारे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर महत्वाचे माध्यम ठरते आहे. महाविद्यालयीन तरुणाईची शक्ती आणि गावकºयांचा सहभाग असेल आपला गाव स्वच्छ सुंदर व निरोगी करता येऊ शकते. असे प्रतिपादन कार्यक्रम व्यवस्थापक डी. एस. बिसेन यांनी केले.
स्वामी रामानंद तिर्थ कला व वाणिज्य महाविद्यालय मासळच्या पुढाकारातून लाखांदूर तालुक्यातील गुंजेपार (किन्ही) येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सरपंच उत्तम भागडकर, काँग्रेसच्या प्रमिला कुटे, काशिनाथ हुमणे, लाखांदूरचे ठाणेदार बन्सोडे, उपसरपंच ब्रम्हदास देशमुख, प्रकाश नाकतोडे, हर्षवर्धन हुमणे, अंकुश गभणे, अजय गजापुरे, राजेश येरणे, नेत्रदिपक बोडखे, नागपुरे, देवानंद कावळे, राजाराम सोनटक्के, कुटे, राजाराम देशमुख, मुकुंदराव देशमुख, नितीन हुमणे, प्रा. मोटघरे, नवनाथ सोनटक्के आदींची उपस्थिती होती.
यावेळी हुमणे यांनी, गुंजेपार येथे होवून घातलेल्या मागील वर्षीच्या शिबिराच्या आठवणी सांगून गावात विविध कार्यक्रम व पाणी व स्वच्छतेतून परिवर्तन घडविण्यात येणार असल्याचे सांगितले.
सरपंच भागडकर यांनी, रासेयो शिबिराच्या माध्यमातून नागरिकांत सामाजिकतेची भावना जागविण्याचे कार्य होत आहे. सर्वंनी घरासमोरील साचलेला कचरा व नालीत थांबलेले पाणी स्वच्छ करण्यासाठी जे नागरिक पुढाकार घेतात, हेच राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे यश असल्याचे भागडकर यांनी सांगितले. गावात विकासाचे परिवर्तन करायचे असेल तर लोकसहभाग आवश्यक आहे. संघटीत झाल्याशिवाय यश मिळणार नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले.
प्रमिला कुटे यांनी, एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरु सुपंथ, या म्हणीप्रमाणे गावात नागरिकांनी एकमेकाला सहाय्य करून पुढाकार घेतला तर गावाला स्वच्छ व सुंदर करण्यास वेळ लागणार नाही. विविध कार्यात गावात नावलौकीक करता येईले. जसा विद्यार्थी हा शिष्य व शिक्षक हा गुरु असतो त्याचप्रमाणे आईवडीलही गुरु आहेत. मुल आणि आईवडीलात ज्या प्रमाणे मित्रत्वाचे नाते असेल तर तो कुटुंब सुखी व समृद्ध होते. त्याचप्रमाणे गावकरी एकत्र होवून मित्रत्वाप्रमाणे वागले तर गावातील सामाजिक बदल घडविता येईल, असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी ठाणेदार बन्सोडे यांनी, गावात शांतता प्रस्थापित ठेवण्यासाठी सलोख्याचे संबंध निर्माण करावे, व्यसनमुक्त समाज करण्यावर भर देऊन गाव स्वच्छ व सुंदर करण्याचे प्रतिपादन केले. यावेळी विद्यार्थी, महिला व पुरूषांची मोठी उपस्थिती होती.

Web Title: Transplanting of the village due to youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.