साडेतीन लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 11:11 PM2018-04-21T23:11:56+5:302018-04-21T23:11:56+5:30

गुप्त माहितीच्या आधारे दोन वेगवेगळ्या घटनेत जवाहरनगर पोलिसांनी दारू तयार करणाऱ्या ठिकाणावर धाडी घालून तीन लक्ष २९ हजार ५६० किमतीचा दारुसाठा व साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.

Three and a half million liquor seized | साडेतीन लाखांची दारू जप्त

साडेतीन लाखांची दारू जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : गुप्त माहितीच्या आधारे दोन वेगवेगळ्या घटनेत जवाहरनगर पोलिसांनी दारू तयार करणाऱ्या ठिकाणावर धाडी घालून तीन लक्ष २९ हजार ५६० किमतीचा दारुसाठा व साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.
जवाहरनगर पोलीस ठाणे सीमेलगत मोहफुलांच्या दारुचा अवैध व्यवसाय करीत असल्याच्या गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. शुक्रवारी सकाळी पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम व अपेक्षा मेश्राम, सहाय्यक फौजदार शेंडे, गस्तीवर असताना खैरी पांधी वैनगंगा नदी किनाºयावर मोहफुल दारुचा अवैध व्यवसाय करीत असताना रंगेहात पकडण्यात आले. यात एकुण ५२ हजार रुपये, ३ मोठे लोखंडी पिंप किंमत दोन हजार ४०० रुपये, पाच लोखंडी चौकोनी पिंप किंमत २५० रुपये, पाच हजार किलो जळावू लाकूड किंमत ५ हजार रुपये, एम.एच. ३६ वाय ५०२५ क्रमांकाची दुचाकी किंमत ४५ हजार रुपये व ६० लिटर हातभट्टी मोहफुलाची दारु किंमत चार हजार २०० रुपये असे एक लक्ष दहा हजार ५०० रुपये साहित्यांसह कमल बालाजी मेश्राम (२५) रा.शहापूर, गजानन सदाशिव मांढरे (२७) रा.शहापूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीअंती सदर दारुभट्टी ही विनोद खोब्रागडे रा.शहापूर यांच्या मालकीची असल्याचे सिद्ध झाले.
दुसºया कारवाई शनिवारी सकाळी ७.३० वाजता सुमारास ठाणेदार यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार देवराम साखरे, मनोहर रामटेके, पोलीस नायक प्रमोद पढाल, पोलीस शिपाई अमोल सारोख, कुणाल कढव, सहाय्यक फौजदार चालक राजू थोटे यांच्या सहकार्यासोबत शंकर मारबते यांचे शेताजवळील ढोडी (नाला) शहापूर येथे दारु काढताना पकडले. यात सहा लिटर दारु, ४० किलो सडवा मोहा किंमत ४३ हजार दोनशे रुपये, एक पांढºया रंगाची एम.एच. ३६ - वाय ९२६९ क्रमांकानी दुचाकीसह रविंद्र बांडेबुचे (६५) व हेमराज नागदेवे (३२) दोन्ही राहणार गोपीवाडा यास ताब्यात घेण्यात आले. दुसºया ठिकाणी राहत्या घरी अरुण सेलोकर (३०) राहणार शहापूर या ठिकाणाहून मोहफुलाच्या दारुने भरलेले १४ ट्युब प्रत्येकी ४२ लिटर अशी ५८८ लिटर दारु किंमत २९ हजार ४०० रुपये व ५० लिटर हातभट्टी दारुने भरलेला ड्रम जप्त करण्यात आला.
यात तीन लक्ष २९ हजार ५६० रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. सदर दारु साठा वैनगंगा नदीत व शहापूर येथील दारूसाठा पोलीस स्टेशनच्या आवारात नष्ट करण्यात आला. सदर दोन्ही घटनेच्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.

Web Title: Three and a half million liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.