निम्न चुलबंद प्रकल्पाची चाचणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:16 PM2018-07-17T22:16:45+5:302018-07-17T22:17:06+5:30

Test the following cluttering project | निम्न चुलबंद प्रकल्पाची चाचणी पूर्ण

निम्न चुलबंद प्रकल्पाची चाचणी पूर्ण

Next
ठळक मुद्देपाणी तलावात सोडणार : सहा हजार हेक्टर सिंचनाची सुविधा

संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : तालुक्यात कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्प तब्बल २३ वर्षानंतर पूर्ण झाला असून येत्या आठवडाभरात या प्रकल्पाचे पाणी तलावामध्ये सोडण्यात येणार आहे. सहा हजार हेक्टर सिंचन सिंचनाची सोय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. यासाठी सोमवारला पंपहाऊस व संबंधित यंत्र सज्ज असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
साकोली तालुक्यात पारंपारिक शेती व्यवसाय असून बहुतांश लोक भात शेती करतात. तालुका निसर्ग सानिध्यानी नटलेला असून या तालुक्यातून चुलबंद नदीचा प्रवाह आहे. मात्र शेतीला सिंचनाची सोय नव्हती. शेती सिंचनासाठी चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्पाचे १९९५ मध्ये भूमिपूजन करण्यात आले. तेव्हापासून कधी राजकीय अडचणी तर कधी निधीची कमतरता अशा एक ना अनेक अडचणीतून हा प्रकल्प रेंंगाळत्ला. शेतकऱ्यांची प्रतीक्षा दिवसेंदिवस वाढतच गेली. एकेकाळी तर शेतकऱ्यांची निराशाच झाली होती की हा प्रकल्प होणार की नाही. अनेक वर्षे निधीअभावी या प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात होते. नंतर पुन्हा या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आणि आता हा प्रकल्प पूर्ण झाला. आता लवकरच प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पात एकुण सात दरवाजे असून चुलबंद नदीचे पाणी या प्रकल्पात अडविण्यात येणार आहे. तसेच हे अडविलेले पाणी पंपहाऊसच्या सहाय्याने डाव्या व उजव्या कालव्याच्या सहाय्याने तलावात सोडण्यात येणार आहे.
तलाव पूर्ण भरणार
या प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार असून तलाव प्रकल्पाच्या पाण्याने पूर्णपणे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार आहे.
पिण्यासाठी राखीव राहणार पाणी
या प्रकल्पांतर्गत डिसेंबरपर्यंत पाणी तलावात व नंतर येणारे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
या प्रकल्पाच्या उभारणीमुळे शेतीला सिंचनाची सोय आहे. त्यामुळे निसर्गावर अवलंबून राहणाऱ्यां शेतकऱ्यांना आता तलावाचे पाणी मिळणार. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

सदर प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या पंगृहाऊसचे काम पूर्ण झाले असून या पंपहाऊसची चाचणी पूर्ण झाली आहे. येत्या एक दोन दिवसातच या प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार असून या पाण्याचा शेतीला मोठा फायदा होणार आहे.
-अमोल चोपडे, उपविभागीय अभियंता

Web Title: Test the following cluttering project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.