गणेशपूर येथील सामूहिक विवाह सोहळ्यात दहा जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 09:53 PM2018-04-22T21:53:01+5:302018-04-22T21:53:01+5:30

केशवराव बहुउद्देशिय शिक्षण संस्था मानेगाव (बाजार) च्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा गणेशपूर येथे पार पडला. या सोहळ्यात दहा जोडपी विवाहबद्ध झाली.

Ten couples married at a group marriage ceremony in Ganeshpur | गणेशपूर येथील सामूहिक विवाह सोहळ्यात दहा जोडपी विवाहबद्ध

गणेशपूर येथील सामूहिक विवाह सोहळ्यात दहा जोडपी विवाहबद्ध

googlenewsNext
ठळक मुद्देकेशवराव बहुउद्देशिय शिक्षण संस्था मानेगाव (बाजार) च्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा गणेशपूर येथे पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केशवराव बहुउद्देशिय शिक्षण संस्था मानेगाव (बाजार) च्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा गणेशपूर येथे पार पडला. या सोहळ्यात दहा जोडपी विवाहबद्ध झाली.
या विवाह सोहळ्याचे आयोजक संस्थेचे संस्थापक माजी सभापती नरेश डहारे यांनी अतिथींचे स्वागत केले. या विवाह सोहळ्याचे उद्घाटन वर्षाबेन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, आ.चरण वाघमार, माजी खासदार नाना पटोले, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार मधुकर कुकडे, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, महेश जैन, धनंजय दलाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदू कुर्झेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, दिपक गजभिये, सभापती प्रेमदास वनवे, धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, जि.प. सदस्य ज्योती खवास, उत्तम कळपते, सुभाष आजबले, पं.स. सदस्य सुजाता फेंडर, रितू सेलोकर, मनिषा वाघमारे, देवचंद ठाकरे, सदानंद इलमे, के.डी. शेंडे, अ‍ॅड.रवी वाढई, संजय केवट उपस्थित होते. यावेळी वर्षाबेन पटेल यांनी विवाह सोहळ्याच्या मंचावर सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्र येतात तर, जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रीत का नाही असा प्रश्न करुन त्यांनी भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र यावे असे आवाहन केले. प्रास्ताविक नरेश डहारे यांनी केले. सन २०११ पासून संस्थेच्या वतीने गोरगरीबांचे विवाह करण्याची संधी मिळाली. त्यात पालकांना धन्य मानतो. आतापर्यंत आठ वर्ष पूर्ण झाली. या आठ वर्षात १४९ विवाह झालेत. या वर्षी दहा जोडपी विवाहबद्ध झाली. संचालन मनोज बोरकर, दिपक चिमणकर यांनी केले. आभार प्रदर्शन अरविंद पडोळे यांनी केले.

Web Title: Ten couples married at a group marriage ceremony in Ganeshpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न