शिक्षकांच्या हितासाठी प्रशासनाशी भांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:02 PM2018-08-12T22:02:02+5:302018-08-12T22:02:21+5:30

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. शिक्षकांच्या हितासाठी संघटना प्रशासनासोबत दोन हात करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांनी केले.

Tackle with the administration for the welfare of teachers | शिक्षकांच्या हितासाठी प्रशासनाशी भांडणार

शिक्षकांच्या हितासाठी प्रशासनाशी भांडणार

googlenewsNext
ठळक मुद्देमुबारक सय्यद: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: प्राथमिक शिक्षकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. शिक्षकांच्या हितासाठी संघटना प्रशासनासोबत दोन हात करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांनी केले.
शिक्षक सहकारी पतसंस्था भंडाराच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली रविारला पार पडली. या सभेमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. पुढील काळात या विषयाची सोडवणूक करण्यासाठी संघर्षाचा पवित्रा घेण्याचे ठरविण्यात आले.
जिल्हातंर्गत झालेल्या आॅनलाईन बदल्यांमध्ये संवर्ग १, २ आणि ४ मध्ये चुकीच्या माहितीच्या आधारे लाभ घेणाऱ्या शिक्षकांवर संपूर्ण राज्यात कार्यवाही करण्यात आली.परंतु भंडारा जिल्ह्यामध्ये या संदर्भात शासनाच्या स्पष्ट सुचना असूनही अजून पर्यंत कार्यवाही करण्यात आली नाही.संबंधित शिक्षकांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी.विज्ञान विषय शिक्षक पदोन्नती करताना बारावी विज्ञान शिक्षकांबरोबार बी एससी करत असणाºया शिक्षकांनाही पदोन्नती देण्यात यावी, सेवासातत्याचा लाभ विनाविलंब देण्यात यावा, शिष्यवृत्ती संदर्भात समाजकल्याण विभाग पंचायत समिती सोबत आवश्यक कार्यवाही करीत नसल्याने मुख्याध्यापक यांना माहिती भरताना अडचणींचा सामना करावा लागतो.
या प्रश्नाच्या अनुषंगाने समाजकल्याण अधिकारी यांना भेटून जाब विचारण्याचे ठरले. विषय शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख पदोन्नत्या तात्काळ करण्यात यावे, अंतिम सेवाजेष्टता यादी तात्काळ प्रसिध्द करण्यात यावी. शिक्षण परिषद शनिवार, रविवार ला न घेता पूर्ण दिवस शाळा असताना घेण्यात यावी, केंद्रप्रमुखाना कोणत्याही प्रकारची मदत करण्यात येऊ नये, वैद्यकीय बिलांचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यात यावे, यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच तालुका कार्यकारिणी लवकर गठित करण्यात यावी, असा ठराव घेण्यात आला.
संजीव बावनकर यांनी शिक्षक पतसंस्था प्रगती विषयी माहिती दिली. पतसंस्था सभा १६ सप्टेंबरला भंडारा येथे होईल असे सांगितले.तसेच दिलीप बावनकर यांनी पतसंस्था बाबत विचार व्यक्त केले. संचालन सारचिटनिस सुधीर वाघमारे यांनी तर, आभार मुकेश मेश्राम यांनी मानले.
सभेला सरचिटणीस सुधीर वाघमारे, राज्य पदाधिकारी राधेश्याम आमकर, सुरेंद्र उके, शिक्षक सहकारी पतसंस्था अध्यक्ष संजीव बावनकर, राज्य उपाध्यक्ष दिलीप बावनकर, दिनेश गायधने, मुकेश मेश्राम, शिक्षक नेते राजेश सूर्यवंशी, दिनेश घोडीचोर, कैलास बुद्धे, तालुका कार्यकारिणी पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Tackle with the administration for the welfare of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.