सुर नदी पुन्हा प्रवाहित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 10:41 PM2018-02-25T22:41:41+5:302018-02-25T22:41:41+5:30

तालुक्यातील सुरनदी, गायमुख नदी, लहान ओढे, तसेच सिमेंट प्लग बंधाऱ्यातील प्रवाह थांबला आहे. आता या नद्या व बंधाऱ्यातून प्र्रवाह वाहायला चार-पाच महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Sur river flowing again | सुर नदी पुन्हा प्रवाहित होणार

सुर नदी पुन्हा प्रवाहित होणार

Next
ठळक मुद्देपेंचचे पाणी येणार : पाणी टंचाईवर उपाय

आॅनलाईन लोकमत
मोहाडी : तालुक्यातील सुरनदी, गायमुख नदी, लहान ओढे, तसेच सिमेंट प्लग बंधाऱ्यातील प्रवाह थांबला आहे. आता या नद्या व बंधाऱ्यातून प्र्रवाह वाहायला चार-पाच महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तथापि, पाणी टंचाईवर उपाय म्हणून पेंच प्रकल्पाचे पाणी सुरनदीमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोरडी झालेली सुरनदी पुन्हा प्रवाहित होणार आहे.
पाणीटंचाईची झळ आतापासूनच जाणवू लागली आहे. दरवर्षी पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. पाणी पुरवठा योजना असतानाही त्या योजना प्रभावित होतात. मोहाडी व मोहगाव देवी येथील नागरिकांना एक दोन दिवसाआड उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मिळत असते. तेही मुबलक नाही. एका दिवसाचा पाणी तीन तीन दिवस पाणी पिण्यासाठी वापरला जातो. एवढी गंभीर परिस्थिती मोहाडी येथे निर्माण होते. नळाचे पाणी मिळावे म्हणून अनेक घरी खोल टाकी केली गेली आहे. मोहाडीत वॉडावॉर्डात हातपंप असले तरी पिण्यायोग्य पाणी नाही. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक कुटुंबांना विकत पाणी घ्यावे लागते.
सुरनदीचा पाणी पावसाळ्यात पूर्ण वाहून जातो. पाणी अडविण्याची व्यवस्था कुठेच केली गेली नाही. रोहना मार्गावर कोल्हापूरी बंधारा आहे. त्या बंधाºयातही एक थेंबही पाणी उन्हाळ्यात दिसत नाही. शिवाय असे कोल्हापुरी बंधारे कान्हळगाव, मोहाडी येथे आहेत पण शासन व प्रशासनाच्या अनास्थेपायी या बंधाºयांची परिस्थिती वाईट झाली आहे. पाणी अडविण्यासाठी लहान नद्या, ओठ्यांवर शाश्वत उपाय अजुनतरी झाले नाही. तालुक्यात जलयुक्त शिवार अंतर्गत छान काम झाले आहे. बऱ्याच बंधाऱ्यात पाणी साचून राहते. पण, याचा वापर शेतकरी, कृषी उत्पन्न घेण्यासाठी तसेच जनावरांना पाणी पाजण्यासाठी करीत असतो.
दरवर्षी भूजल पातळीत घट होत आहे. शासनाकडून मिळणाऱ्या विहिरीतही बोअर केली जाते. यावरून पाण्याची समस्या बिकटच होत चालली आहे. मोहाडी तालुक्यातील ग्रामीण विभागाची लोकसंख्या १,६१,७९४ एवढी आहे. ७७ ग्रामपंचायती व ९६ गावे आहेत. मोहाडी तालुक्यात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना एक आहे. स्वतंत्र पाणी पुरवठा योजना ७७, यापैकी एक योजना बंद अवस्थेत आहे. ७२७ हातपंप आहेत व सार्वजनिक विहिरी ३३३ अशी पिण्याच्या पाण्याची साधने आहेत. वरठी येथील प्रस्तावित योजनेत निविदा कार्यवाही सुरू आहे.
कुशारी येथील निविदा कार्यवाही सुरू क रण्यात आली आहे. शिवणी येथील योजनेसाठी तांत्रिक मंजुरी प्राप्त झाली असून प्रशासकीय मान्यतेची कार्यवाहीसाठी प्रतिक्षा आहे. मोहगाव देवी, जांब, नवेगाव, धुसाळा येथील प्रस्तावाचे प्राकलन सादर झाले आहे. मोहाडी तालुक्यात विहिरी खोल करणे व गाळ काढण्यासाठी १४ गाव व कामे १७, बुडक्या घेणे, खाजगी विहिरीचे अधिग्रहाची ३ कामे ३ गावात, नळ योजनांची विशेष दुरूस्ती २६ गावात, विंधन विहरीची विशेष दुरूस्तीची ८ कामे ५ गावात, विंधन विहरी ५० गावात ७७ कामे असे १३१ कामे घेण्यात येणार आहेत. यासाठी १४४.११ लक्ष रूयये खर्च करण्यात येणार आहे. एप्रिल ते जून या महिन्यात विहिरी खोल करण्याची कामे ४३ घेण्यात येतील. नळयोजनांची दुरूस्ती ३ गावात करण्यात येणार आहे.

Web Title: Sur river flowing again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.