सुनील मेंढे यांना ६ लाख ५० हजार विक्रमी मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:49 AM2019-05-25T00:49:02+5:302019-05-25T00:49:57+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या इतिहासात विक्रमी ६ लाख ५० हजार २४३ मते घेत भाजपाचे सुनील मेंढे यांनी विजय संपादित केला. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांना ४ लाख ५२ हजार ८४९ मते या निवडणुकीत मिळाले असून सुनील मेंढे यांचा १ लाख ९७ हजार ३९४ मताधिक्यांनी विजय झाला.

Sunil Mendhe has 6 lakh 50 thousand records | सुनील मेंढे यांना ६ लाख ५० हजार विक्रमी मते

सुनील मेंढे यांना ६ लाख ५० हजार विक्रमी मते

Next
ठळक मुद्देभंडारा विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक लीड : मेंढे यांना ५२.२३ टक्के तर नाना पंचबुद्धे यांना ३६.३८ टक्के मते

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या इतिहासात विक्रमी ६ लाख ५० हजार २४३ मते घेत भाजपाचे सुनील मेंढे यांनी विजय संपादित केला. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांना ४ लाख ५२ हजार ८४९ मते या निवडणुकीत मिळाले असून सुनील मेंढे यांचा १ लाख ९७ हजार ३९४ मताधिक्यांनी विजय झाला. मेंढे यांना सहा विधानसभा मतदार संघांपैकी सर्वाधिक लीड भंडारा विधानसभा क्षेत्रात मिळाली.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गुरूवारी सकाळी ८ वाजता सुरू होवून मध्यरात्री संपली. तब्बल ३३ फेऱ्या मतमोजणीच्या पार पडल्या. प्रत्येक फेरीत भाजपाचे सुनील मेंढे आघाडी घेत असल्याने दुपारीच विजयाचे चित्र स्पष्ट झाले होते. मात्र अंतीम निकाल रात्री २.१५ मिनिटानी घोषित झाला. त्यानंतर विजयी उमेदवार भाजपाचे सुनील मेंढे यांना जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक पार्थ सारथी मिश्रा, उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी उपस्थित होते.
या निवडणुकीत भाजपाचे सुनील मेंढे यांना ६ लाख ५० हजार २४३, राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांना ४ लाख ५२ हजार ८४९, बसपाच्या डॉ. विजया नंदुरकर यांना ५२ हजार ६५९, वंचित बहुजन आघाडीचे कारू नान्हे यांना ४५ हजार ८४२, पिपल्स पार्टी आॅफ इंडिया डेमाक्रॉटीकचे भीमराव बोरकर यांना १ हजार ४६८, भारतीय शक्तीचेतना पार्टीचे भोजराज मरस्कोल्हे यांना ९०५ मते तर अपक्ष निलेश कलचुरी यांना ५४७, प्रमोद गजभिये, ९८०, मिलिंदकुमार जैस्वाल २ हजार ६९९, देविदास लांजेवार १ हजार ५४९, राजेंद्र पटले १३ हजार १४५, डॉ. सुनील चवळे १ हजार ५०७, सुमीत पांडे यांना ३ हजार ३१, सुहास फुंडे यांना ६ हजार ९८३ मते मिळाली. या निवडणुकीत अपक्षांमध्ये सर्वाधिक राजेंद्र पटले यांना १३ हजार १४५ मते मिळाली. १४ उमेदवारांमध्ये आठ अपक्ष उमेदवारांनी आपले भाग्य अजमावले. या आठ अपक्ष उमेदवारांच्या एकूण मतांची बेरीज ३४ हजार ४४४ होते. विशेष म्हणजे सुनील मेंढे व नाना पंचबुद्धे वगळता सर्व १२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात भाजपचे सुनील मेंढे यांना ५२.२३ टक्के तर राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांना ३६.३८ टक्के मते मिळाली होती. गत २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार नाना पटोले यांना ५०.६२ टक्के तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना ३८.१६ टक्के मते मिळाली होती.
नोटाला दहा हजार ५२४ मते
लोकसभा निवडणुकीत १० हजार ५२४ मतदारांना १४ पैकी कोणताही उमेदवार पसंत नसल्याने त्यांनी नोटाचे बटन दाबले. त्यात ई बॅलेटचे दहा आणि पोस्टल बॅलेटचे १०२ मतदार आहेत.
पोस्टल मतात पंचबुद्धेंना आघाडी
लोकसभा निवडणुकीत पोस्टल बॅलेटमध्ये मात्र मतदारांनी राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांना पसंती दिली. त्यात पंचबुद्धे यांना ४ हजार ३५८, मेंढे यांना ३ हजार ७१ मते मिळाली. ९ हजार १३४ मतदारांनी पोस्टल बॅलेटने मतदान केले. त्यापैकी १०२ मतदारांनी नोटाला मत दिले. तर १ हजार १७३ मते अवैध ठरली.
भाजपाला सहाही विधानसभेत आघाडी
भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे यांनी सहाही विधानसभा क्षेत्रात आघाडी घेतली. सर्वाधिक आघाडी भंडारा विधानसभेत मिळाली. मेंढे यांना १ लाख ३२ हजार ९ मते तर पंचबुद्धे यांना ७७ हजार ४५६ मते मिळाली. भंडारा विधानसभेत ५४ हजार ५५३ मतांची आघाडी मिळाली. भाजपाला तुमसर विधानसभा क्षेत्रात ३६ हजार ६५७, साकोलीत ३२ हजार ४३६, अर्जुनी मोरगाव १५ हजार ९९, तिरोडा २० हजार ७०७, गोंदिया ३८ हजार ४१६ मतांची आघाडी मिळाली.
 

Web Title: Sunil Mendhe has 6 lakh 50 thousand records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.