विद्यार्थ्यांनी उद्दिष्टांकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:33 AM2017-11-21T00:33:33+5:302017-11-21T00:34:36+5:30

शहरीभागात शैक्षणिक, नोकरीविषयक मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संस्था उदयास आल्या.

Students should turn to objectives | विद्यार्थ्यांनी उद्दिष्टांकडे वळावे

विद्यार्थ्यांनी उद्दिष्टांकडे वळावे

Next
ठळक मुद्देउपसेन बोरकर यांचे प्रतिपादन : पवनीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

आॅनलाईन लोकमत
पवनी : शहरीभागात शैक्षणिक, नोकरीविषयक मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संस्था उदयास आल्या. परंतु गावपातळीवरील शिकणारा वर्ग यापासून दूर राहिला असला तरी विद्यार्थ्याने आपले शैक्षणिक उद्दिष्ट ठरवून त्या उद्दिष्टाकडे सतत चालत राहा, असे प्रतिपादन उपायुक्त उपसेन बोरकर यांनी केले.
बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा तालुका पवनीच्या वतीने गांधीभवन येथे आयोजित विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरातून प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. मार्गदर्शक पीएसआय, बावनकर यांनी विद्यार्थ्यांना एमपीएससी तसेच युपीएससी परीक्षेसंबंधी कोणता अभ्यास कसा व किती करावा यासंबंधी बोलताना स्पर्धा परीक्षेसाठी असलेला अभ्यासक्रम याची पुरेपुर जाणीव करून त्यात वारंवार येणाºया प्रश्नांचा सराव करावा व त्यांची तयारी करावी.
उपसेन बोरकर म्हणाले, शिक्षणाचे खासगीकरण तसेच उद्योग व्यवसायांचे खासगीकरण त्यामुळे आजपर्यंत मिळत असलेल्या शासकीय नोकºया मिळणे कठीण झाले. यश प्राप्त करताना अनेक अडचणी आल्या, मानहानी सोसावी लागली तरी पुढे चालत राहा, लोक काय म्हणतील याची तमा न बाळगू नका असेही बोरकर म्हणाले.
तसेच कधीकधी येणारे प्रश्नही निट समजावून सांगावे. पदवी पर्यंत शिक्षण घेतलेला कोणताही विद्यार्थी प्रयत्न करून स्पर्धा परीक्षा देऊ शकतो. यात खूप टक्केवारी किंवा सर्व विषयांचा सखोल ज्ञानाची गरज नसून जवळपास चौथी ते १२ वी पर्यंतच्या विषयांचे सामान्य ज्ञान तसेच मुळ संकल्पना स्पष्ट करून, सामान्य ज्ञान तसेच दररोजच्या घडणाºया देश विदेश पातळीवरच्या घटना, वर्तमानपत्र, टीव्ही वरून नोंद केल्यास स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळू शकते. असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांत निर्माण केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांनी आपल्या परिसरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी जागरूक नसल्याची खंत व्यक्त करून त्यांच्यात शैक्षणिक रोजगार तसेच वर्तन समस्या, वरिष्ठांच्या आज्ञान पाळणे या समस्यामुळे मोठा असून, स्पर्धा परीक्षेसाठी जागृती होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
उपस्थित विजयकुमार, वैशाली, अशोक पारधी यांनीही विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घेतल्याशिवाय नोकरी मिळणारच नाही या संबंधी आस्वस्थ केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थी व युवा यांची शैक्षणिक सामाजिक व आर्थिक वास्तविक अवस्था यावर प्रमुख मार्गदर्शक प्रा.संजय मगर यांनी देशातील बहुजन समाजाला एकाकी पाडून, त्यांना शिक्षण, नोकऱ्या व्यवसाय यात कोंडमारा करून हलाकीची परिस्थिती निर्माण करण्याचे षडयंत्र सुरु असून बहुजन समाजाच्या नोकºया आरक्षण पळविल्या व लाचारी, गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न सुरु असल्यामुळे वेळीच बहुजन विद्यार्थ्यांनी क्रांतीसाठी उठून तयार असावे. विद्यार्थ्यांनो तुमचे भविष्याचे तुम्हीच शिल्पकार आहात.
कार्यक्रमाचे आयोजन, व्यवस्थापन संदीप मोटघरे, शुभम राहांगडाले, बी.आर.व्ही.एम. चे जिल्हा व पवनी तालुका पदाधिकारी श्रीकांत देशमुख, अश्विन मेश्राम, हरिश उकरे, मोनू पचारे, ऐश्वर्या दहिवले, प्रणय शेंडे, पंकज पडोळे, वासंती भुरे, कार्तिक अन्नपुर्णे, संदीप शेरकुरे, शुभम माथूरकर, आशिष भुरे, अंजनी भाजीपाले, स्नेहल हुमणे, प्रज्ञा मेश्राम, चेतन जनबंधू, पूनम शेंडे, मोनू पचारे, अक्षय लकडस्वार, रोशन मेंढे, प्रगती रामटेके, पुष्पा कावळे, पंकज पत्रे, शुभम राहांगडाले, शशांक नागदेवे, प्रतिक गजभिये यांनी व्यवस्थापनात सहकार्य केले.

Web Title: Students should turn to objectives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.