विद्यार्थ्यांनो मोठी स्वप्न पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 09:44 PM2019-01-31T21:44:24+5:302019-01-31T21:45:12+5:30

विद्यार्थ्यांनो शालेय जीवनात अभ्यासासह क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग महत्त्वपूर्ण आहे. आधी आपले ध्येय ठरवा आणि ते गाठण्यासाठी परिश्रम घ्या, मोठी स्वप्ने पाहा आणि ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यादृष्टीने वाटचाल करा, तुमच्या परिश्रमाचे फळ निश्चितच तुम्हाला मिळेल असे मत मनोहरभाई पटेल अ‍ॅकडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी केले.

Students see a big dream | विद्यार्थ्यांनो मोठी स्वप्न पाहा

विद्यार्थ्यांनो मोठी स्वप्न पाहा

Next
ठळक मुद्देवर्षा पटेल : वार्षिक स्रेहसंमेलन, सत्कार व पालक मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विद्यार्थ्यांनो शालेय जीवनात अभ्यासासह क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग महत्त्वपूर्ण आहे. आधी आपले ध्येय ठरवा आणि ते गाठण्यासाठी परिश्रम घ्या, मोठी स्वप्ने पाहा आणि ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यादृष्टीने वाटचाल करा, तुमच्या परिश्रमाचे फळ निश्चितच तुम्हाला मिळेल असे मत मनोहरभाई पटेल अ‍ॅकडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी केले.
गोंदिया शिक्षण संस्था गोंदियाद्वारा संचालित जीईएस हायस्कुल व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पांढराबोडी विद्यालयाचे वार्षिक स्रेहसंमेलन व पालक मेळाव्याचे आयोजन बुधवारी (दि.३०) प्राचार्य बी.एच.जीवानी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या.
गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव माजी आ. राजेंद्र जैन, जयेशभाई पटेल, जि.प.सदस्य रजनी गौतम, अध्यक्ष रा.यु.काँग्रेस जितेश टेंभरे, जि.प.सदस्य खुशबू टेंभरे,जि.प.सदस्य भोजराज चुलपार, पं.स.सदस्य डुलेश्वरी योगलाल लिल्हारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंदन गजभिये, पांढराबोडी सरपंच ईमला चुलपार, उपसरपंच धुरण सुलाखे, नवेगावचे सरपंच राजकुमार सुलाखे, विद्यालयाचे प्राचार्य बी.एच.जीवानी, क्रीडा प्रशिक्षक पी.एच.चव्हाण, स्रेहसंमेलन प्रभारी यु.सी.रहांगडाले, कोषाध्यक्ष आर.एस.रहमतकर, प्रणय परशुरामकर व विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व स्व.मनोहरभाई पटेल यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून करण्यात आली. वर्षा पटेल म्हणाल्या, शाळेमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळत असल्याचे सांगितले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक, सरपंच तसेच विद्यालयातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ नागरिक म्हणून विष्णूदास वैद्य, गणूजी लिल्हारे, निलंबाजी न्यायकरे, कुंजीलाल खजरे, ईमला चुलपार यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थी इंजि. शिवरतन चुलपार, डॉ. राकेश गराडे, डॉ. किर्तीकुमार चुलपार तसेच प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये शालू मंडिया, अंजू सुलाखे या विद्यार्थिनींचा शरदभाई रावजीभाई पटेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळाचे सचिव जयेशभाई पटेल यांच्याकडून सुवर्ण पदक गौरविन्यात आले. राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक प्राप्त करणारा विद्यार्थी कपिल चिखलोंढे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
विनोदकुमार माने, प्रा.सुनील लिचडे, गेंदलाल दुधबरई यांनी तयार केलेले मनोहर बातमी संकलनाचे प्रकाशन राजेंद्र जैन यांच्या करण्यात आले. प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य बी.एच.जीवानी यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.सी. सुंकरवार, प्रा.सुनील लिचडे तर आभार प्रभारी यु.सी.रहांगडाले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Students see a big dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.