विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला सराव परीक्षेची बळकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:16 PM2019-02-19T22:16:34+5:302019-02-19T22:16:55+5:30

बाल मनात आत्मविश्वाचे बळ निर्माण करण्याचे काम ध्येयवेडे शिक्षकच करतात. शिक्षक ते अधिकारी पदापर्यंत पोहचलेले भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा नवोपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला सशक्त करण्याचे कार्य होत आहे.

Strengthening of Practice Test for students' confidence | विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला सराव परीक्षेची बळकटी

विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला सराव परीक्षेची बळकटी

Next
ठळक मुद्देनवोपक्रम : भंडारा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बाल मनात आत्मविश्वाचे बळ निर्माण करण्याचे काम ध्येयवेडे शिक्षकच करतात. शिक्षक ते अधिकारी पदापर्यंत पोहचलेले भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा नवोपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला सशक्त करण्याचे कार्य होत आहे.
शिक्षण विभागामार्फत शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्याचा नवोपक्रम जिल्ह्यात प्रथमच भंडारा पंचायत समितीचे घेतला आहे. या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला सशक्त करण्याचे कार्य होत आहे. शिक्षण विभागामार्फत शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्याचा नवोपक्रम जिल्ह्यात प्रथमच भंडारा पंचायत समितीने घेतला आहे. शालेय जीवनातली शिष्यवृत्ती परीक्षा महत्वाची समजली जाते. या परीक्षेतून आत्मविश्वास वाढविणे शिष्यवृत्ती मुख्य परीक्षेची पूर्वतयारी तसेच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करण्यासाठी भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला बळकटीची साथ सर्व शिक्षक संघटना, केंद्र प्रमुख व शिक्षकांनी दिली.
शिक्षक संघटना व विविध घटकांमुळे शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा नवोपक्रम पूर्णत्वास गेला आहे. याउपक्रमासाठी शासन स्तरावरून कोणताही निधी उपलब्ध झाला नाही. विद्यार्थी केंद्रीत उपक्रम हाती घेत भंडारा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका काढली. मुळ प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स प्रती शुल्क न घेता केंद्र प्रमुखांच्या मार्फत मुख्याध्यापकांना वितरीत करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी संख्येनुसार प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्सचा खर्च मुख्याध्यापकांना शाळा अनुदान या शिर्षकातून करावयाचा आहे. सराव प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढण्याच्या खर्चाचा भुर्दंड मुख्याध्यापकांवर बसणार नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांनीही शिक्षण विभागाच्या उपक्रमाला मनापासून साथ दिली आहे. भंडारा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १३४ व खाजगी अनुदानित १२८ अशा २६२ शाळांमध्ये २१ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. सराव परीक्षेच्या दिवशी शाळा भेटीचे नियोजन तयार करण्यात आले आहे. ३२ कर्मचाऱ्यांचे पथक सराव परीक्षेचे पर्यवेक्षण करणार आहेत. यात केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, विस्तार अधिकारी, फिरते शिक्षक यांचा समावेश आहे. राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर सराव परीक्षा शाळा स्तरावर घेण्यात येईल. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता मुख्याध्यापक पाळणार आहेत.

Web Title: Strengthening of Practice Test for students' confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.