ठळक मुद्देतुमसर-बपेरा मार्गावर पाच तास ‘रास्ता रोको’ : शेतकरी-पोलिसांमध्ये शाब्दिक वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : मावा, तुडतुडा या रोगाने धानाचे पीक उद्ध्वस्त झाले असताना चुकीची वाढीव आणेवारी दाखविण्यात आली आहे. यामुळे शासकीय मदतीपासून शेतकºयांना वंचित करण्याचा डाव असल्याने तुमसर बपेरा राज्य मार्गावरील चुल्हाड बसस्थानक येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांचे नेतृत्वात शेतकºयांनी पाच तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी राज्यमार्गावर धानाच्या पेंढ्या जाळण्यात आल्या. पोलीस आणि शेतकºयात शाब्दिक चकमक झाली.
सिहोरा परिसरात खरिप हंगामात धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. १२ हजार हेक्टर आर क्षेत्रात ही लागवड असली तरी धान कापनीचे तोंडावर या धान पिकाला मावा, तुडतुडा या रोगाने फस्त केले. शेतकºयांना एक पोती धानाचे पिक झाले नाही. असे असताना शासनाने वाढीव व चुकीची आणेवारी घोषित केली आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदती पासून वंचित करण्याचा डाव शासन आणि प्रशासनाचा आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत किडीमुळे नुकसान असा निकष नाही. यामुळेपिक विमा योजनेपासून वंचित राहण्याची भिती शेतकºयांत आहे. जिल्हाधिकाºयांनी धानपिक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिली आहेत. परंतु रोगामुळे नुकसान झालेल्या धानाला आर्थिक मदत व पिक विमा योजनेचा लाभ दिला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली नाही. फक्त सर्वेक्षण करून वेळ मारून नेली जात असल्याची चर्चा आहे. कर्जमाफी देताना लालीपाप दाखविण्यात आल्याचा आरोप करित तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील चुल्हाड बस स्थानक येथे आज दुपारी १२ वाजता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले, शेखर कोतपल्लीवार, योगराज टेंभरे, गुड्डू शामकुंवर आणि कंठीलाल ठाकरे यांचे नेतृत्वात शेतकºयांनी पाच तास रास्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. आधी सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत शेतकºयांचे आर्थिक नुकसान संदर्भात चर्चा करण्यात आली. या चर्चेत नायब तहसिलदार अशोक पाटील, मंडळ कृषी अधिकारी एस.जी. उईके, पोलीस निरीक्षक मनोहर कोरोटी, मंडळ अधिकारी मिश्रा उपस्थित होते. चर्चेत चुकीची आणेवारी प्रसिद्ध केल्यावरून शेतकºयांत रोष निर्माण झाला आहे. प्रत्येक्षात शेत शिवारात तणीस उभी असून शेतात उभ्या धानाला आग लावण्यात येत आहे. शासन शेतकºयांचे जखमेवर मिठ लावण्याचा प्रयत्न करित असल्याने ठोस आश्वासन शेतकºयांना चर्चेत मिळाले नाही. पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना वाहनात डांबण्याचा प्रयत्न केला. या वाहनाला शेतकºयांनी अडविले. संपूर्ण आंदोलन कर्त्यांना अटक करण्याचे घोषणा शेतकºयांनी दिल्या. यामुळे आंदोलनात तनाव निर्माण झाला. पोलिसांचे वाहन अडविण्यात आल्याने पोलीस आणि शेतकºयांत शाब्दिक चकमक झाली. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे आणि प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती शेतकºयांना देण्यात आली असून सुधारित आणेवारी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर आंदोलनकर्त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांनी आंदोलन कर्त्यांची समजुत घातल्याने आंदोलन थांबले. या आंदोलनात छोटू ठाकरे, चौधरी, दिवाजी अंबुले, नत्थु पटले, माणिक बघेले, विजय बोरकर, हरिद्वार पटले सहभागी झाले.