पाणीपुरवठा योजनेसाठी विशेष ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:27 AM2019-02-08T00:27:58+5:302019-02-08T00:29:09+5:30

गत दहा वर्षांपासून सातत्याने पाणीप्रश्न मार्गी लागावा, या हेतुने तरुणापासून तर वृध्दापर्यंत सर्वांनी नानाविध उपाययोजना केली. यात पालकमंत्री, आमदार देखील हतबल झाले. शेवटी गावातील सुमारे दिडशे नागरिकांनी सह्यांचे निवेदनाद्वारे चार जानेवारीला ग्रामपंचायतला दिले.

Special gram sabha for water supply scheme | पाणीपुरवठा योजनेसाठी विशेष ग्रामसभा

पाणीपुरवठा योजनेसाठी विशेष ग्रामसभा

Next
ठळक मुद्देतारांकित प्रश्नानंतरही तिढा कायम : प्रकरण ठाणा पेट्रोलपंप येथील दीड कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : गत दहा वर्षांपासून सातत्याने पाणीप्रश्न मार्गी लागावा, या हेतुने तरुणापासून तर वृध्दापर्यंत सर्वांनी नानाविध उपाययोजना केली. यात पालकमंत्री, आमदार देखील हतबल झाले. शेवटी गावातील सुमारे दिडशे नागरिकांनी सह्यांचे निवेदनाद्वारे चार जानेवारीला ग्रामपंचायतला दिले. मासिक व ग्रामसभेत चर्चा न करता अर्जाकडे दुर्लक्ष केले. परिणामी तहकुब ग्रामसभेत महिलांनी मागणी रेटून धरली. अखेर सचिवाला विशेष ग्रामसभेचे आयोजन ११ फेब्रुवारीला करण्याचे भाग पाडले.
जिल्ह्याच्या पश्चिम टोकावर असलेले विकसीत खेडेगाव म्हणजे ठाणा पेट्रोलपंप. येथे १५ अधिक सरपंच असे एकंदरीत १६ सदस्य ग्रामपंचायतमध्ये विराजमान आहे. येथील भौगोलीक परिस्थितीचा विचार करता ९० टक्के घरे व अंतर्गत रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे आहेत. १२ वर्षापुर्वी टंचाईकृती आराखड्याअंतर्गत खरबी-ठाणा संयुक्त नळयोजना कार्यान्वित होती. १३ सार्वजनिक नळ स्टॅडपोस्टद्वारे जमीनीवर दोन फुट उंचावर उच्चदाबयुक्त पाणी दिवसाला दोन वेळा गावकऱ्यांना मिळत होते. दरम्यान गावाला जलशुध्दीकरणाव्दारे पाणी मिळावे, याकरिता तत्कालीन राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे, सामाजिक कार्यकर्ते दिनदयाल देशभ्रतार, माजी सरपंच राजेश गिरी, उपसरपंच रामचंद्र किंदर्ले, पाणीपुरवठा समिती सदस्य अनिल पाटील, ऋषीराज मेळे, प्रल्हाद हुमणे, किसन मानकर यांच्याद्वारे ३० जुन २००५ मध्ये महाजल स्वजलधारा अंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथे स्वतंत्र नविन नळ योजना मंजुरीचा ठराव पारीत करुन मुंबई-दिल्ली कार्यालयाद्वारे एक कोटी ४६ लक्ष किंमतीची महत्वाकांक्षी नळ योजना आणली. रितसर नळयोजनेचे भूमीपूजन जून २००९ ला करण्यात आले.
नियोजनानुसार कामाला सुरुवात करण्यात आली. लगेच ग्रामपचांयत निवडणुका लागल्या नविन सदस्य ग्रामपचांयत व पाणीपुरवठा समितीमध्ये आले. कालांतराने राज्यातही रस्ता परिवर्तन झाले. एकाच कामाला तीन कंत्राटदाराकरवी गावातील पाणीपुरवठा कामे करण्यात आली. काम कसे सुरु आहे यावर कुणाचेही लक्ष नव्हते. ९० टक्के रक्कम खर्च झाले. मात्र गावाला एक थेंब पाण्याचे मिळाले नाही. तरुण, ज्येष्ठ महिला पुरुषांनी पाणी प्रश्नाबाबत ग्रामपंचायत पाणीपुरवठा समिती व जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर मिळत होते. गावातील नवीन वाढीव पाईप लाईनची मागणी मंजुर करुन ‘क’ चे मिशन करीत होते. दिड कोटी खर्च झाले, मात्र गावाला एक थेंब पाणी देऊ शकले नाही. आमदार रामचंद्र अवसरे यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित केले होते. येथे ही ‘क’ चे मिशन करणारा खाऊदास पोहचला आणि प्रकरण थंडावला. पालकमंत्र्यांकडेही ठाणा येथील पाणी प्रश्न रेटले यातही यश पदरी पडले नाही. अमित देशभ्रतार यांनी माहितीचा अधिकार वापर केला. यावरही ‘क’ चे मिशनधारक येऊन ठेपले. हतबल झालेले ग्रामस्थ आता शेवटचा उपाय म्हणून ४ जानेवारीला दिडसे नागरिकांच्या सह्या असलेले निवेदन ग्रामपंचायत ठाणा पेट्रोलपंपला दिला. मात्र ग्रामपंचायतच्या मासिक सभेत २६ जानेवारीच्या तहकुब ग्रामसभेत विषय चर्चेला घेतला नाही व निर्णय घेतला नाही. गावातील महिलांनी २ फेब्रुवारीच्या तहकुब ग्रामसभेत गावातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लागण्यासाठी विशेष ग्रामसभा ११ फेब्रुवारीला आयोजित केली होती.

Web Title: Special gram sabha for water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.