पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:37 PM2019-06-17T23:37:02+5:302019-06-17T23:37:35+5:30

१५ जून उलटला तरी अद्याप पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा चिंतित झाला आहे. रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राचा अर्धा कालावधी संपत आला तरी अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

Sowing can be avoided due to rain | पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

googlenewsNext
ठळक मुद्देबळीराजाचे डोळे लागले आकाशाकडे : अपुऱ्या सिंचन सुविधांचा परिणाम, पीककर्ज मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : १५ जून उलटला तरी अद्याप पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा चिंतित झाला आहे. रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राचा अर्धा कालावधी संपत आला तरी अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात गोसे धरणाची निर्मिती झाली असली तरी जिल्ह्याचा बहुतांश भाग आजही कोरडवाहू आहे. त्यामुळे मान्सूनच्या पावसावरच शेतकºयांचे अर्थकारण चालते. योग्यवेळी मान्सूनचा पाऊस झाल्यास पीकावर रोगकिडींचा प्रादुर्भाव कमी होतो. खरीप हंगामातील उत्पन्न चांगले झाल्यास शेतकºयांची वर्षभराची चिंता मिटते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून पावसाच्या अनियमिततेमुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात आला आहे.
जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत असल्याने अनेक ठिकाणी ग्रामीण भागात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या दुग्धव्यवसायावर देखील परिणाम होत असून दूध उत्पादन निम्म्यावर आले आहे.शेतकºयाच्या समस्यांत वाढ होत असून याकडे शासन स्तरावरुन विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.पिक कर्जासाठी शासन कितीही गाजावाजा करत असले तरीही ग्रामीण भागातील बँकामध्ये पीक कर्जासाठी शेतकºयांना बँकाचे उंबरठे झीजवावे लागत आहे. गावोगावी तलाठ्यांनी मुख्यालयी पाठ फिरविल्याने शेतकºयांना योग्य वेळेत कागदपत्र मिळत नाहीत.खरीप हंगामात देखील तलाठी मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याने शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देवून महसुल व बँक कर्मचाऱ्यांना सुचना देवून शेतकºयांच्या समस्या सोडवण्याची गरज आहे.
कर्मचाऱ्यांची मुख्यालयांकडे पाठ
अनेक ठिकाणी खरीप हंगामात देखील तलाठी,कृषी सहाय्यक उपस्थित राहत नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत.शेतकºयांना सात बारा,आठ अ,पिकपेरा ही कागदपत्रे बँकेत सादर केल्याशिवाय पिककर्ज मंजूर होत नाही.परंतु शासकीय कर्मचाºयांच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकºयांना पिककर्ज मिळवण्यात अडचणी येत आहेत.

दरवर्षीच्या कमी पावसाने शेतकºयांचे उत्पन्न घटले आहे. यावर्षी तरी वेळेत पाऊस झाल्यास चांगल्या पीकपाण्याची अपेक्षा होती. परंतु पावसाचा पत्ताच नसल्याने अजूनही बी-बियाणे, खतांची खरेदी केलेली नाही.
-दीपक गिºहेपुंजे,
शेतकरी, खरबी नाका

Web Title: Sowing can be avoided due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.