अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अन्नधान्याची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:26 AM2017-07-24T00:26:41+5:302017-07-24T00:26:41+5:30

परिसरातील बाक्टी, निमगाव, इंझोरी येथील रहिवासी असलेल्या मुलांवर जन्मदात्यांचे छत्र अचानक हिरावून गेल्याने...

Schooling and Food Assistance for Orphan Students | अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अन्नधान्याची मदत

अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अन्नधान्याची मदत

Next

आधार : सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : परिसरातील बाक्टी, निमगाव, इंझोरी येथील रहिवासी असलेल्या मुलांवर जन्मदात्यांचे छत्र अचानक हिरावून गेल्याने ऐन खेळण्या-बाळगण्याच्या दिवसामध्ये त्यांच्यावर अनाथ होण्याची वेळ आली. परिणामी मोठ्या काटकसरीने जीवन काढावे लागत आहे. वयोवृद्ध आजीच्या ममतेने काटेरी जीवनाशी सामना करावे लागत आहे. सामाजिक बांधिलकीची नाळ जुळली असल्याने लोकमतच्या बातमीने परिसरातील अनाथ मुलांना मदत करण्यासाठी समाजशील दानदाते पुढे येत आहेत.
सामाजिक कार्यसाठी सदैव तत्पर असलेल्या प्रा. सविता बेदरकर यांच्या पुढाकारानी परिसरातील बाक्टी, इंझोरी येथील अनाथ झालेल्या बहिण-भावंना शालेय साहित्यासह किराणा व अन्नधान्याची घरपोच मदत करण्यात आली.
बाक्टी व इंझोरी येथील आईवडिलांचे छत्र हिरावून अनाथ झालेले व मिलिंद विद्यालय चान्ना (बाक्टी) येथे विद्यार्जन करीत असलेल्या पोरक्या विद्यार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे, प्राचार्य हेमंत राजगिरे, पर्यवेक्षक राजन बोरकर, उदाराम शेंडे उपस्थित होते. प्रा. सविता बेदरकर वेळोवेळी परिसरातील अनाथ मुलांना रोख रकमेसह गहू, तांदूळ व किराणा साहित्याचा पुरवठा करीत असतात. गोंदियाच्या साकेत पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांकडून तांदूळ, रमेश होतचंदानी ग्लॉस सेंटरकडून तेलाचा टिन, शिल्पा मटाले यांचे कडून किराणा, माजी जि.प. सभापती सविता पुराम यांच्याकडून एक हजार रूपये या प्रकारे साहित्य जमा करुन सविता बेदरकर यांनी लोकमतचे प्रतिनिधीकडे सुपूर्द केले. साहित्याचे वाटप मिलिंद विद्यालयाच्या पटांगणात डॉ. कुंदन कुलसुंगे यांच्या हस्ते अनाथ झालेले स्रेहा दिनेश मेश्राम, वीराज मेश्राम, सिमरन नाशिक सांगोळे, प्रज्वल सांगोळे, इंझोरीची काजल गोपाल शेंडे यांना शालेय साहित्य, तांदूळ, किराणा सामान वाटप केला.

कुलसुंगे यांच्याकडून ३ हजारांची मदत
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे यांनी आपला खारीचा वाटा त्या अनाथांना लाभावा, अशी अपेक्षा करुन त्यांनी अन्नधान्याच्या वाटपाप्रसंगी तिन्ही कुटुंबातील अनाथांना प्रत्येकी एक हजार प्रमाणे तीन हजार रुपये रोख दिले. त्यांनी सामाजिक दायित्वाची भूमिका पार पाडली. प्राचार्य हेमंत राजगिरे यांनी लोकमतच्या वृत्ताने अनाथ मुलांच्या जीवनात नवसंजिवणी निर्माण करण्याची संधी उपलब्ध झाल्याने त्यांनी लोकमतचे आभार मानले.

Web Title: Schooling and Food Assistance for Orphan Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.