ठळक मुद्देकरडी परिसरातील २७ गावांवर अन्याय : पडीत शेतीबाबत चौकशी केव्हा होणार?

युवराज गोमासे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : करडी परिसरातील २७ गावात सन २०१७-१८ खरीप हंगामातील धान पिकांचे १०० टक्के लागवड क्षेत्र ५,६०० हेक्टर आहे. त्यातही अपुºया पावसामुळे खोळंबून प्रत्यक्ष रोवणी झालेले क्षेत्र २१०८ हेक्टर असून टक्केवारी ३८ आहे तर पडीत शेतीचे क्षेत्र ३४९२ हेक्टर असून टक्केवारी ६२ आहे. प्रत्यक्ष लागवडीचे क्षेत्र कमी तर पडीत शेतीचे क्षेत्र दुप्पट असतानाही मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची सुधारित पैसेवारी ५९ पैसे दाखविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आकड्यांचा ताळेबंद लावण्यास करडी परिसराची प्रत्यक्ष पैसेवारी २४ पैसेच असल्याचे शेतकºयांचे म्हणणे असून शासन प्रशासनाने करडी परिसरावर अन्याय केल्याची भावना व्यक्त होत आहेत. पडीत शेतीची चौकशी केव्हा होणार, असाही प्रश्न विचारला जात आहे. मोहाडी तालुका वैनगंगा नदीमुळे दोन भागात विभाजीत असून करडी परिसर जंगल टेकड्यांनी व्यापलेला आहे. सिंचनाच्या पाहिजे तशा सुविधा नाहीत. शेती कोरडवाहू व निसर्गावर आधारित आहे. तलाव व बोड्यांची संख्या बरीच असतानाही अतिक्रमण व गाळामुळे सिंचन क्षमता बेताची आहे. सिंचन विहिरींची एक तास पुरेल इतकी क्षमता नाही. त्यातच भारनियमन, किड, तुळतुळा, गादमाशी, खोडकिडा व अन्य रोगांनी नाशधुस नेहमीचीच बाब झाली आहे.
करडी परिसरता २७ गावांत सर्वाधिक धानाचे पिक खरीप हंगामात घेतले जाते. सन २०१७-१८ खरीप हंगामात १०० टक्के म्हणजे ५, ६०० हेक्टर क्षेत्रात धान पिकाच्या पेरण्या झाल्या. मात्र, अलप व वेळेवर पाऊस न आल्याने फक्त ३८ टक्के क्षेत्रात म्हणजे २०१८ हेक्टर क्षेत्रात धानाची रोवणी झाली तर रोवणी अभावी ३४९२ हेक्टर ६२ टक्के क्षेत्र पडीत राहिले. पडीत क्षेत्र मोठे असतानाही शासन स्तरावरून किंवा जिल्हाधिकारी स्तरावरून अद्यापही चौकशी वा पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणांना मिळालेले नाहीत. उलट फक्त रोवणी झालेल्या क्षेत्राची पैसेवारी ५९ पैसे काढण्यात आली.
पिकविम्यापासून शेतकरी वंचित
करडी परिसरातील एकूण धान पिकांखालील क्षेत्र व रोवणी झालेले क्षेत्र तसेच पडीत राहिलेले क्षेत्र यात बरेच अंतर आहे. त्यामुळे आकड्यांचा ताळेबंद केल्यास करडी परिसराची पैसेवारी २४ पैसे असतानाही २७ गावांची सुधारित पैसेवारी तालुक्यातील १०८ गावांबरोबर ५९ पैसे दाखविण्यात आली आहे. जिल्हाधिकाºयांनी तुळतुळा व रोगांमुळे झालेल्या नुकसानीचे आदेश दिले असताना पडीत शेतीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहणार आहेत.
पंचनामे होऊनही मदत मिळाली नाही
खरीप हंगाम सन २०१६-१७ मध्ये करडी परिसरातील २७ गावांतील भात पिकाखालील लागवडीचे १०० टक्के क्षेत्र ५५८० हेक्टर होते. प्रत्यक्ष रोवणी झालेले क्षेत्र ४६९१ हेक्टर ८४ टक्के होते. पडीत राहिलेल्या क्षेत्र ८८९ हेक्टर १६ टक्के होते. जिल्हाधिकाºयांच्या सुचनेनुसार १६ टक्के पडीत राहिलेल्या शेतीच्या पंचनामे यंत्रणेमार्फत तयार करण्यात येवून अहवाल सादर करण्यात आला होता. मात्र, वर्ष लोटले असतानाही पडित शेती राहिलेल्या शेतकºयांना एक रूपयाची मदत अद्याप प्राप्त झालेली नाही. जिल्हाधिकाºयांनी प्रकरणी लक्ष देण्याची गरज आहे.

करडी परिसरात रोवणी झालेल्या क्षेत्रापेक्षा पडीत राहिलेल्या शेतीचे प्रमाण दुप्पट आहे. मात्र, तालुक्यातील सुधारित पैसेवारी ५९ पैसे दाखविण्यात आल्याने करडी परिसरावर अन्याय झालेला आहे. जिल्हाधिकाºयांनी तुळतुळा व रोगांमुळे झालेल्या नुकसानीचे चौकशीचे आदेश दिले. मात्र, पडीत शेतीची चौकशी गुलदस्त्यात आहे. प्र्रकरणी शासन प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
-वासुदेव बांते, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मोहाडी.