निसर्गाच्या कर्जाची परतफेड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:06 PM2018-07-22T22:06:32+5:302018-07-22T22:06:49+5:30

निसर्गाकडून प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर आॅक्सिजन घेतो. परंतु निसर्गाने दिलेल्या या कर्जाची परतफेड करीत नाही. हे कर्ज फेडण्यासाठी घरी व परिसरात कमीत कमी दोन वृक्ष लावून निसर्गाच्या कर्जाची परतफेड करा, असे आवाहन पालकमंत्री चद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Repay the nature loan | निसर्गाच्या कर्जाची परतफेड करा

निसर्गाच्या कर्जाची परतफेड करा

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : पवनीत फ्लायकॅचर्स वाईल्ड फ्रेन्डस्तर्फे १६ हजार वृक्ष लागवड

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : निसर्गाकडून प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर आॅक्सिजन घेतो. परंतु निसर्गाने दिलेल्या या कर्जाची परतफेड करीत नाही. हे कर्ज फेडण्यासाठी घरी व परिसरात कमीत कमी दोन वृक्ष लावून निसर्गाच्या कर्जाची परतफेड करा, असे आवाहन पालकमंत्री चद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. १ ते ३१ जुलै पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पवनी येथे १६ हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वृक्ष लागवडीमुळे पर्यावरण संतुलित राखण्यास मदत होणार आहे. वृक्ष लागवडीचा हा उपक्रम देशातच नव्हे तर संपूर्ण जगाला संदेश देणारा आहे, असेही ते म्हणाले.
फ्लायकॅचर्स वाईल्ड फ्रेन्डस्, शिवाजी सायन्स कॉलेज , गोसे विभाग पवनी अभियान फाउंडेशनच्या वतीने १६ हजार वृक्ष लागवडीचा कार्याक्रम शिवाजी सायन्स कॉलेज पवनी येथे आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार रामचंद्र अवसरे, उपवन संरक्षक विवेक होशींग, भाजपा जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी, भंडारा नगराध्यक्ष सुनील मेंढे, पवनी नगराध्यक्ष, पूनम काटेखाये, रवीकीरण गोवेकर, संजीव गौड, नवकीशोर रेड्डी, आर. बी. शर्मा, हरीष तलमले,किशोर पंचभाई, कुंदन हाते, रोहीत कारु उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, पूर्वी आपला देश सोन्याची चिडिया म्हणून लौकिक पावला होता. परंतु वृक्ष तोडीमुळे व औद्योगिकरणामुळे वृक्षाचा व जंगलांचा ऱ्हास होत आहे. त्याचा परिणाम पर्यावरणाचे संतुलनावर होत आहे. ऋतु चक्र बिघडले आहे. निसर्गाच्या होणा?्या या ऱ्हासास आपणच जबाबदार आहेत. म्हणून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करुन व त्याचे संवर्धन करुन पर्यावरण संतुलनास मदत करा. आजपासून आपल्या वाडवडिलांच्या नावे तसेच प्रिय व्यक्तीच्या नावे वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करा, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी आपल्या घरी व परिसरात २ वृक्ष लावून सेल्फी काढावी व ती वन विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी. शासकीय यंत्रणांनी नागरिकांना वृक्षाचा पुरवठा करावा. प्रत्येकांनी घरासमोर झाडे लावून या वृक्ष लागवड कार्यक्रमास प्रतिसाद घ्यावा. या कार्यास प्रथम प्राधान्य दयावे, असेही ते म्हणाले. सर्वांसाठी घरे या योजनेची पवनी येथे लवकरच कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
३१ जुलै पर्यंत चालणाºया वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमास महाविद्यालय, शाळांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिवंत राहण्यासाठी खाण्यापिण्याबरोबरच उन, वारा, पाणी यांची आवश्यकता आहे. शुद्ध वाºयासाठी वृक्ष लागवड करणे व त्याची वाढ करणे आवश्यक आहे. सर्वांगीण विकासासाठी वृक्ष लागवड हा पर्याय आहे. म्हणून प्रत्येकानी किमान २ वृक्ष लावून या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आमदार रामचंद्र अवसरे यांनी सांगितले. यावेळी पवनीच्या नगराध्यक्षा पूनम काटेखाये यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमात महाराष्ट्रात प्रथमच सीडबॉलचा प्रयोग करण्यात आला आहे. हा सिडबॉल कुठेही टाकल्यास तिथे वृक्ष लागवड होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Web Title: Repay the nature loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.