शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्यांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 09:57 PM2018-03-18T21:57:23+5:302018-03-18T21:57:23+5:30

जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीनुसार विविध प्रकारच्या शिधापत्रिकांसाठी नवनवीन सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ट करण्यात येत असल्यामुळे अनेकांना स्वस्त धान्याची उचल करण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

Ration card holders are deprived of cheap grains | शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्यांपासून वंचित

शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्यांपासून वंचित

Next
ठळक मुद्देसॉफ्टवेअर ठरताहे त्रासदायक : अन्न पुरवठा विभागाविरुद्ध शिधापत्रिकाधारकांचा रोष, स्वस्त धान्यासाठी रांगा

आॅनलाईन लोकमत
जवाहरनगर : जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीनुसार विविध प्रकारच्या शिधापत्रिकांसाठी नवनवीन सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ट करण्यात येत असल्यामुळे अनेकांना स्वस्त धान्याची उचल करण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक शिधापत्रिकाधारकांनी अन्न पुरवठा विभागाविरुध्द रोष व्यक्त केला आहे.
याबाबत असे की, शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा, या उद्देशाने नवनवीन आधुनिक सॉफ्टवेअर विकसीत होत आहे. शासन विविध कार्यालयात या सॉफ्टवेअरचा उपयोग करीत आहे. याचा अनेकांना फायदा जरी होत असला तरी हे सॉफ्टवेअर तितकेच घातक व त्रासदायक ठरत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. याची प्रचिती सार्वजनिक वितरण प्रणालीवर दिसून येत आहे. माहितीनुसार, मागील महिन्यात ठाणा पेट्रोलपंप येथील शिधापत्रिकाधारकांना 'पॉस मशिन'द्वारे धान्याचे वाटप करण्यात आले. मात्र मार्च महिन्यात तीच कार्डधारक महिला स्वस्त धान्य घ्यायला आली असता 'पॉस मशीन'द्वारे महिलांच्या कोणत्याही बोटाचे ठसे आधारकार्डनुसार जुळत नाही. परिणामी त्या महिलेने आपल्या मुलीला बोलावून तिच्या बोटाचे ठसे त्या यंत्रामध्ये जुळवण्याचा प्रयत्न केले असता तेही जुळत नाही. अखेर तासभरानंतर सदर महिलेला दुसऱ्या रजीस्टरवर धान्याची उचल करीत नोंद करण्यात आली. प्रत्यक्ष शिधापत्रिकाधारकांकडून अशी ओरड आहे की तीन ते चार वेळा सर्व कुटुंबाचे आधार व बँकेचे खाते पुस्तीकेची झेरॉक्स प्रत 'लिंकींग' करीता दिले असता कुटुंब प्रमुखाचे नावासमोर दुसरेच आधार कार्ड लिंकींग झाल्याची ओरड आहे. याविषयी तहसील कार्यालयात माहिती जाणून घेतली असता संबधित कार्ड बोगस असल्याचे सांगण्यात आले. दुसरी बाब म्हणजे महिना दोन महिन्यानंतर नवीन सॉफ्टवेअर समाविष्ट झाल्याने अनेकांना 'लिंक फेल' व आधार क्रमांक जुळवाजुळव होत नसल्याने तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. परिणामी कार्डधारकांचा धान्य वितरीत करणाऱ्यावर रोष व्यक्त करीत असतात.

सरद सार्वजनिक वितरण धान्य दुकानात लागलेले थम मशीनमध्ये नवीन सॉफ्टवेअरमुळे कार्ड धारकांचे थम जुळत नाही. याकरिता धान्य दुकानात वरिष्ठ तांत्रिक कर्मचाºयाला पाचारण करून वितरण व्यवस्था सुरळीत करण्यात येईल. प्रत्यक्ष प्राप्त तक्रारीचे निराकरण करण्यात येणार आहे.
-चंद्रशेखर वानखेडे, अन्न पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय भंडारा

Web Title: Ration card holders are deprived of cheap grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.