जिल्ह्यात पाऊस बेपत्ता, रोवणीची कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:43 PM2019-07-16T23:43:23+5:302019-07-16T23:43:35+5:30

जिल्ह्यात गत दोन आठवड्यापासून पाऊस बेपत्ता झाला असून चिंतातूर शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ १९ टक्केच पावसाची नोंद झाली असून गतवर्षी याच काळात ३३ टक्के पाऊस पडला होता. निम्म्यापेक्षा अधिक रोवणीही झाली होती. मात्र यंदा आतापर्यंत केवळ ५ टक्केच रोवणी आटोपली असून शेतातील पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत.

Rains disappear in the district; | जिल्ह्यात पाऊस बेपत्ता, रोवणीची कामे खोळंबली

जिल्ह्यात पाऊस बेपत्ता, रोवणीची कामे खोळंबली

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे : वार्षिक सरासरीच्या केवळ १९ टक्के पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गत दोन आठवड्यापासून पाऊस बेपत्ता झाला असून चिंतातूर शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ १९ टक्केच पावसाची नोंद झाली असून गतवर्षी याच काळात ३३ टक्के पाऊस पडला होता. निम्म्यापेक्षा अधिक रोवणीही झाली होती. मात्र यंदा आतापर्यंत केवळ ५ टक्केच रोवणी आटोपली असून शेतातील पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत.
भंडारा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. भाताच्या शेतीसाठी मुबलक पावसाची गरज असते. भंडारा जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान १३३०.२ मिमी आहे. तर १ जून ते १६ जुलै पर्यंत जिल्ह्यात सरासरी ४२३ मिमी पाऊस कोसळतो. मात्र यंदा वरुण राजा शेतकºयांवर कोपल्याचे दिसत आहे. रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेले. आद्रा नक्षत्रात पाऊस कोसळला. परंतु तो रोवणीयोग्यच नव्हता. जिल्ह्यात १ जून ते १६ जुलै या कालावधीत २५४.२ मिमी पाऊस कोसळला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ १९ टक्के तर सद्य कालावधीच्या ६० टक्के आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत ४४४.९ मिमी पाऊस कोसळला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात अर्ध्या अधिक रोवणीची कामे आटोपली होती. परंतु यंदा रोवणीयोग्य पाऊसच झाला नाही. धानाच्या बांध्यात पाणीच साचले नाही. शेतात असलेले पऱ्हे पिवळे पडत आहे. या पºह्यांना वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. परंतु अपुऱ्या विजेअभावी त्यांनाही सिंचन करणे कठीण जात आहे.
जिल्ह्यात २ लाख ३ हजार ६१६ हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ८० हजार १२५ हेक्टर क्षेत्र केवळ भाताचे आहे. परंतु पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यात केवळ ५ टक्के रोवणी आटोपली आहे. हवामान खाते दररोज नवनवीन हवामानाचा अंदाज वर्तवित आहे. परंतु प्रत्येक दिवस स्वच्छ सूर्यप्रकाशाचा निघत आहे. शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसले आहेत. परंतु पाऊस पडण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. अपुऱ्या पावसाने धान शेती तर धोक्यात आलीच त्यासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे.
रोवणी झालेल्या शेताला भेगा
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी पालोरा परिसरात रोवणी झालेल्या शेतात भेगा पडल्या आहेत. जलसाठ्यात वेगाने घट होत असून पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. १५ दिवसापासून पाऊस कोसळला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. पऱ्हे पिवळे पडून कोमेजत आहेत. सिंचनाची साधने असणाऱ्या शेतकऱ्यांनी विहिर, नाले व तलावाच्या माध्यमातून रोवणी केली. मात्र आता पावसाअभावी रोवणी पूर्णत: ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट बेचैन करीत आहे. रोवणी झालेल्या शेतात तडे पडले असून शेतकºयांच्या डोळ्यात पाणी येत आहे.

Web Title: Rains disappear in the district;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.