जनतेची कामे प्रशासनाकडून अचूकतेने व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:52 PM2017-11-24T23:52:38+5:302017-11-24T23:52:59+5:30

जलयुक्त शिवार, पाणी पुरवठा योजना, मागेल त्याला शेततळे, कर्जमाफी, सिंचन विहिरी व स्वच्छ भारत मिशन, गोसेखुर्द प्रकल्पासह विविध विकासकामांचे जिल्हा प्रशासनाकडून अचुकतेने नियोजन व्हावे.

Public works should be done by the administration accurately | जनतेची कामे प्रशासनाकडून अचूकतेने व्हावी

जनतेची कामे प्रशासनाकडून अचूकतेने व्हावी

Next
ठळक मुद्देविभागीय आयुक्त अनुपकुमार : विविध विकासकामांचा आढावा

आॅनलाईन लोकमत
भंडारा : जलयुक्त शिवार, पाणी पुरवठा योजना, मागेल त्याला शेततळे, कर्जमाफी, सिंचन विहिरी व स्वच्छ भारत मिशन, गोसेखुर्द प्रकल्पासह विविध विकासकामांचे जिल्हा प्रशासनाकडून अचुकतेने नियोजन व्हावे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत विविध विकास कामासंदर्भात दिलेल्या निर्देशांची पुर्तता करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिले.
अशोक लेलँड गडेगाव येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, निवासी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व अधिकारी उपस्थित होते.
विकास कामांचा आढाव्यात मनरेगा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पोलीस गृहनिर्माण, मागेल त्याला शेततळे, कृषिपंप, मेक इन महाराष्ट्र, राईस क्लस्टर, रस्ते बांधकाम, पाणी पुरवठा योजना, पट्टे वाटप, प्रधानमंत्री पिक विमा योजना, मावा, तुडतुडे प्रादुर्भाव या विषयाचा समावेश आहे.
मागेल त्याला शेततळे या योजनेत जिल्ह्यात ४४६ शेततळे पूर्ण झाले आहे. ३३७ सिंचन विहिरी पूर्ण झाल्या असून ५२७ सिंचन विहिरींचे काम प्रगतीपथावर आहे. दिलेले उद्दिष्ट मार्चपूर्वी पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाने नियोजन करावे, अशा सूचना दिले.
प्रलंबित कृषिपंप जोडणीबाबत आयुक्त म्हणाले, प्रलंबित जोडणी पूर्ण करण्यासाठी उपाययोजना आखून ३१ मार्चपूर्वी ही कामे पूर्ण करण्यासाठी सांगितले. शबरी घरकुल योजना, रमाई आवास योजना व इंदिरा आवास योजना याबाबतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. स्वच्छ भारत मिशनमध्ये भंडारा जिल्ह्याचे काम उल्लेखणीय असल्याचे सांगून आयुक्त म्हणाले, जिल्ह्याची ओडीएफ प्लसच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. जिल्ह्याची ही प्रगती थांबता कामा नये, यात यंत्रणांनी सातत्य कायम ठेवावे, असे ते म्हणाले. ग्रामस्थांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे, यासाठी जिल्ह्यात ५७ ठिकाणी आर.ओ. मशिन बसविण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी सांगितले.
नगरपालिका क्षेत्रासाठी वॉर्डनिहाय आर.ओ. प्लाँट मशिन बसविण्याचे प्रस्तावित करा, रस्ते तयार करतांना अपघात टाळण्याच्या उपाययोजना करा, असे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीत सोंडयाटोला उपसा सिंचन योजना, बावनथडी प्रकल्प, गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. साकोली, लाखनी, घानोड, देव्हाडी, सुकळी नकुल, व गोबरवाही येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाच्या बंद पाणी पुरवठा योजनाबाबत व पट्टेवाटपाबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. प्रधानमंत्री पीकविमा योजना, मावा-तुडतुडे प्रादुर्भावाबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत महसूल, अभिलेख स्कॅनिंग, आॅनलाईन सातबारा, खनिकर्म आदी विभागाचा आढावा आयुक्तांनी घेतला.

Web Title: Public works should be done by the administration accurately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.