परीक्षा काळात नियमित बस सेवा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 09:47 PM2019-02-20T21:47:07+5:302019-02-20T21:47:25+5:30

गुरुवारपासून होणाऱ्या इयत्ता १२ वीचा पेपर सुरू होत असल्यामुळे नियमित बससेवा सुरू ठेवण्याची मागणी एनएसयूआयने आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Provide regular bus services during the exam | परीक्षा काळात नियमित बस सेवा द्या

परीक्षा काळात नियमित बस सेवा द्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : गुरुवारपासून होणाऱ्या इयत्ता १२ वीचा पेपर सुरू होत असल्यामुळे नियमित बससेवा सुरू ठेवण्याची मागणी एनएसयूआयने आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
इयत्ता १२ च्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारी पासून सुरू होत असल्यामुळे तुमसर आगरातून ग्रामीण भागात ये-जा करणाºया बस गाड्यात कसल्याही प्रकारची हयगय व निष्काळजी न करता सदर सर्व विद्यार्थी नियमित परीक्षेत बसले पाहिजे, पेपर सुटल्यानंतर त्यांना व्यवस्थित सर्व आपल्या नियमाने बसेसच्या वाहतुकीत हयगय होऊ नये, अशी मागणी आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आहे. शिष्टमंडळात प्रदेश सचिव शुभम गभने, जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, जिल्हा महासचिव शुभम, साठवणे, जिल्हा सचिव आकाश बोन्द्रे, महेश ढेंगे, राजेश सिंदपुरे, कुणाल सिगनजुडे, अनिल भांडके, कार्तिक चिधालोरे, राहुल बडवाईक आदी उपस्थित होते.

Web Title: Provide regular bus services during the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.