प्रकल्पग्रस्ताची २० वर्षांपासून नोकरीसाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:01 AM2019-07-21T01:01:46+5:302019-07-21T01:04:14+5:30

पेंच प्रकल्पात सर्वस्व गमावून बसलेला मोहाडी तालुक्यातील धुसाळा येथील एक तरुण शासकीय नोकरीसाठी भटकंती करीत आहे. प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र घेऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. परंतु २० वर्षांपासून त्याला नोकरी मिळाली नाही.

Project woes for 20 years | प्रकल्पग्रस्ताची २० वर्षांपासून नोकरीसाठी भटकंती

प्रकल्पग्रस्ताची २० वर्षांपासून नोकरीसाठी भटकंती

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयाचे झिजवितो उंबरठे ।कालव्यात शेती अधिग्रहण, आत्मदहनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पेंच प्रकल्पात सर्वस्व गमावून बसलेला मोहाडी तालुक्यातील धुसाळा येथील एक तरुण शासकीय नोकरीसाठी भटकंती करीत आहे. प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र घेऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. परंतु २० वर्षांपासून त्याला नोकरी मिळाली नाही. आता नोकरीचे वयही उलटत चालले आहे. त्यामुळे नोकरी मिळाली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्ताने दिला आहे.
दिनेश गजभिये असे या प्रकल्पग्रस्ताचे नाव आहे. १९९९ मध्ये त्याची दोन एकर जमीन पेंच प्रकल्पाच्या कालव्यासाठी अधिग्रहीत करण्यात आली. त्यावेळी त्याला सरकारी नोकरीसाठी प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र २० वर्षांपासून तो हे प्रमाणपत्र घेऊन नोकरीसाठी भटकंती करीत आहे. परंतु नोकरी लागली नाही.विशेष म्हणजे प्रकल्पग्रस्तांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने आर्थिक मदत दिली जाते. तर शासकीय नियमानुसार सरकारी नोकरीतही समावून घेण्याचे प्रावधान आहे. यानंतरही २० वर्षांपासून प्रकल्पग्रस्त दिनेश गजभिये न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. दिनेश म्हणाला, अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. परंतु अद्यापपर्यंत प्रशासनाच्या वतीने कोणतीही हालचाल झाली नाही. अत्यंत विपरित परिस्थितीत जीवन जगत असून आता नोकरीचे वयही निघून जात आहे.

प्रकल्पग्रस्त दिनेश गजभिये आता ४५ वर्षाचा होत आहे. त्यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. जमिन अधिग्रहीत केल्यानंतरही नोकरी मिळाली नाही. परिवाराला उपासमारीचा सामना करावा लागतो. माझ्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्याला आंधळगाव पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. त्याचे बयाण घेतले. परंतु अद्यापपर्यंत मागणी पूर्ण झाली नाही.

Web Title: Project woes for 20 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.