फुटपाथ व्यापारी आंदोलनाच्या पावित्र्यात

By admin | Published: July 17, 2017 12:20 AM2017-07-17T00:20:43+5:302017-07-17T00:20:43+5:30

अतिक्रमण मोहिम राबविण्यापुर्वी नगर पालिकेने व्यापाऱ्यांच्या सभेत कुणालाही रोजगारापासून वंचित केले जाणार नाही

In the presence of the pavement trade movement | फुटपाथ व्यापारी आंदोलनाच्या पावित्र्यात

फुटपाथ व्यापारी आंदोलनाच्या पावित्र्यात

Next

प्रकरण अतिक्रमण हटाओ माहिमेचे : आश्वासनाची पूर्तता न केल्याने घेतला पवित्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : अतिक्रमण मोहिम राबविण्यापुर्वी नगर पालिकेने व्यापाऱ्यांच्या सभेत कुणालाही रोजगारापासून वंचित केले जाणार नाही असे आश्वासन दिले असतांना सरसकट पुर्णत: दुकानदारावरच बुलडोजर चालवून फुटपाथ व्यापाऱ्यांना बेरोजगार केले. परिणामी उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे नगर पालिकेने फुटपाथ व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी किंवा डीपीआर प्रमाणे नविन जागेची व्यवस्था करुन दयावी या मागणी करिता फुटपाथ व्यापाऱ्यांनी न.प. समोर आमरण उपोषण करण्याचा पवित्रा घेतला आहे.
२९ व ३० जून रोजी नगर पालिका प्रशासनाद्वारे अतिक्रमण मोहिम भर पावसाळ्यात राबविण्यात आली. तत्पूर्वी न.प.ने व्यापाऱ्यांची सभा बोलावली असता त्यात अतिक्रमण मोहिमेंतर्गत बाजारपरिसरातील रस्ते मोकळे करायचे एवढेच नगर पालिकेचे उद्देश आहे, असे सांगितल्याने व्यापाऱ्यांनीही नगर पालिकेच्या नव्हे तर महसुल विभागाच्या जागेवरील अतिक्रमण रस्ते मोकळे करण्यास कोणतीही हरकत घेतली नव्हती.
मात्र प्रत्यक्षात अतिक्रमण मोहिमेला सुरुवात होताच फुटपाथ व्यापाऱ्यांच्या दुकानावरच बुलडोजर चालवून अतिक्रमण मोहिमच बंद करुन ‘एकाला मायेची व दुसऱ्याला मावशी’ची अशी सावत्र वागणूक दिली.
दरम्यान व्यापाऱ्यांनी विचारणा केली असता जागेचे सपाटीकरण केल्यानंतर फुटपाथ व्यापारी दुकाने लावू शकतात असे नगर पालिकाद्वारे सांगितल्या गेले होते.
परंतु १५ दिवसांचा कालावधी लोटला असतांनाही सदर जागेवर दुकान लावण्याची परवानगी दिली. त्यामुळे फुटपाथ व्यापारी बेरोजगार झाले असून त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. बाजार परिसरातील जागा ही महसूल विभागाची आहे. त्या जागेवर गत ४० ते ५० वर्षापासून फुटपाथ व्यापाऱ्यांचे दुकाने ते दुकान तोडण्याचा अधिकारच मुळात नसतांना तो ताडल्या गेली. तत्कालीन नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी अतिक्रमण काढले होते.
मात्र त्यांनी फुटपाथ व्यापाऱ्यांची निटव्यवस्था केली होती. त्याच धर्तीवर आम्हालाही जागा अलॉट करुन दयावी किंवा नविन जागेची व्यवस्था करुन दयावी या मागणीकरिता फुटपाथ व्यापारी त्यांच्या परिवारासह नगर पालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा फुटपाथ व्यापारी संघटनेचे निवेदनातून दिला आहे.
यात सुधाकर वैरागडे, दशरथ देशमुख शिवनंदन खोखले, रामकृष्ण खोब्रागडे, विमला समरित, विष्णू समरित, पुष्पा समरित, नर्मदा बांगळकर, सुनंदा तलमले, मधुकर कुंजेकर, गंगा भोयर, देवराव वंजारी, दिलीप समरित, माधुरी साठवणे, गंगाधर गुर्वे, संजय बनकर, तिसार शेख, विक्रम लांजेवार, सुशिला किरपाने आदींची नावे वरिष्ठांना पाठविलेल्या निवेदनात समाविष्ट आहेत.

Web Title: In the presence of the pavement trade movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.