कलर्स आणि लोकमततर्फे आयोजित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:51 PM2018-03-21T22:51:43+5:302018-03-21T22:51:43+5:30

आजची स्त्री स्मार्ट स्त्री समजली जाते. एकाचवेळी तिला घर, संसार, मुलांच्या शाळा, अभ्यास, घरातील ज्येष्ठांचे आजारपण, पैपाहुणे, नोकरी,व्यवसाय यात तिचा दिवस कसा सरतो तिचे तिलाच समजत नाही.

Organized by Colors and Lokmat | कलर्स आणि लोकमततर्फे आयोजित

कलर्स आणि लोकमततर्फे आयोजित

Next
ठळक मुद्देसंगीताच्या मैफलीत सखी झाल्या धुंदमनोरंजनाची मेजवानी : जुन्या हिंदी मराठी गीतांचा नजराणा

आॅनलाईन लोकमत
भंडारा : आजची स्त्री स्मार्ट स्त्री समजली जाते. एकाचवेळी तिला घर, संसार, मुलांच्या शाळा, अभ्यास, घरातील ज्येष्ठांचे आजारपण, पैपाहुणे, नोकरी,व्यवसाय यात तिचा दिवस कसा सरतो तिचे तिलाच समजत नाही. अशा तिच्या धावपळीच्या जीवनात थोडा विसावा, मनोरंजनाची संधी द्यावी, मराठी नववर्ष अर्थात पाडवा साजरा केल्यानंतर भारतीय कलेचे अविभाज्य अंग असलेल्या संगीताच्या कार्यक्रमाचा तिला आस्वाद घेता यावा या उद्देशाने लोकमत सखी मंच व कलर्स वाहिनी यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सखी सदस्यांसाठी २० मार्च रोजी वृद्धावन लॉन येथे गीत संगीताची मैफिल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना या गीताने मुकुंद पांडे यांच्या आवाजात करण्यात आली. यानंतर आकांक्षा नगरकर यांनी ‘प्यार करते है शान से’ या गीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सैराट चित्रपटातील ‘सैराट झालं जी , हीची चाल तुरु तुरु, मेरे रशके कवल, घुमर घुमर तसेच अशा जुन्या हिंदी, मराठी गाण्यांचा नजराना सखींसमोर सादर केला. सखी व त्यांच्या परिवारांनी सर्व गीतांना दाद दिली. कार्यक्रमात सखींसाठी गेम घेण्यात आले व बक्षिसेही देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री डुंभरे यांनी केले.

‘बेपनाह’ ही कथा प्रेम आणि विश्वासघात यावर आधारित आहे. ज्यात ज़ोया आणि आदित्य या दोघांचे आयुष्य एका घटनेने पूर्णत: बदलून जाते. यात एका रात्री ज़ोयाचा पती आणि आदित्यच्या पत्नीचा एका कार अपघातात मृत्यू होतो. अपघाताच्या वेळी दोघेही एकत्र असल्याचे समजल्यानंतर ज़ोया आणि आदित्यच्या दु:खाची जागा विश्वासघात आणि द्वेषाने घेतली जाते.
आपल्या पतीने विश्वासघात केला, हे मानण्यास ज़ोया तयार नव्हती. आदित्यने त्याच्या पत्नीला विश्वासघातकी मानून तिच्याशी जुळलेल्या प्रत्येक गोष्टीचा द्वेष करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे ज़ोया आणि आदित्य एकत्र येतात आणि यापुढे काय घडते, हे जाणून घेण्यासाठी पहा ‘बेपनाह - एक हादसा दो अजनबी’, ज़ोया आणि आदित्यची कहाणी १९ मार्चपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता फक्त कलर्सवर.

विजेते स्पर्धक - प्रिती मुळेवार, दिपा टेंभुर्णे, ज्योत्सना सूर्यवंशी, आरती निपाने, श्वेता वाडीभस्मे, हर्षा रक्षिये, चंद्रमाला गांधी, थोटे, चित्रा झुरमुरे, मनिषा रक्षिये.

Web Title: Organized by Colors and Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.