अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:37 PM2018-05-18T22:37:06+5:302018-05-18T22:37:28+5:30

भरधाव वेगात असलेल्या दोन ट्रकांमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या ट्रकचालकाला नागपूरला हलविण्यात आले आहे.

One killed in an accident | अपघातात एक ठार

अपघातात एक ठार

Next
ठळक मुद्देबेला येथील घटना: दोन ट्रकची समोरासमोर धडक,एक गंभीर

लोकमत न्युज नेटवर्क
भंडारा : भरधाव वेगात असलेल्या दोन ट्रकांमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या ट्रकचालकाला नागपूरला हलविण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारला पहाटेच्या सुमारास बेला येथील राष्ट्रीय महामार्गावरील महर्षी शाळेसमोर घडली. अपघातातील मृत व जखमीचे नाव कळू शकले नाही.
बेला येथील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक क्रमांक सीजी ०४/एचआर ४०८१ व एमपी ०९ एच जी ३९६२ यांच्यात हा भीषण अपघात घडला. अपघातात दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चुराडा झाल्याने एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला. भंडारा पोलिसांनी ट्रकचालकाचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला. गंभीर जखमी दुसºया ट्रक चालकाला नागपूरला हलविण्यात आले.
याप्रकरणी भंडारा पोलिसांनी एमपी ०९ एच जी ३९६२ च्या चालकाविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास भंडारा पोलीस करीत आहे.

Web Title: One killed in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.