पर्यावरण समितीच्या सभेत वाचला मूलभूत समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:53 AM2018-08-20T00:53:42+5:302018-08-20T00:54:28+5:30

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पर्यावरण व्यवस्थापन समितीची सभा गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता ए.आर. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये पुनर्वसन कामाची प्रगती, धरणामधील नागनदी व पिवळ्या नदीचे प्रदूषण, घोडाझरी मध्ये सिंचनासाठी पाणी सोडणे गोसीखुर्द धरणाचे सौंदर्यीकरण वाढविणे, .....

One of the basic issues that has been read in the meeting of the Environment Committee | पर्यावरण समितीच्या सभेत वाचला मूलभूत समस्यांचा पाढा

पर्यावरण समितीच्या सभेत वाचला मूलभूत समस्यांचा पाढा

googlenewsNext
ठळक मुद्देवाही वसाहतीत सभा : नागनदीचे प्रदूषण, पुनर्वसनावर चिंतन

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पर्यावरण व्यवस्थापन समितीची सभा गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता ए.आर. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये पुनर्वसन कामाची प्रगती, धरणामधील नागनदी व पिवळ्या नदीचे प्रदूषण, घोडाझरी मध्ये सिंचनासाठी पाणी सोडणे गोसीखुर्द धरणाचे सौंदर्यीकरण वाढविणे, धरणामध्ये वाढत असलेल्या इकॉर्नियाचे निर्मूलन करणे, पुनर्वसनस्थळी सर्व नागरी सुविधा पुरविणे आदी विषयावर चर्चा होवून उपाययोजना करण्याचे संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले.
नागपूर शहरातील नागनदी व पिवळी नदीच्या सांड पाण्यामुळे, गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे भंडारा, पवनी या शहरांना व नदीकाठच्या गावांना प्रदूषित पाणी प्यावे लागत आहे. आरोग्याच्या दृष्टीने, मासेमारांच्या दृष्टीने, भविष्यात या प्रदूषित पाण्याचा गंभीर परिणाम होवून शेतीवरही परिणाम होणार आहे.
या ज्वलंत मुद्यांवर सर्वच प्रतिनिधींनी आवाज उचलून नागपूर महानगर प्रतिनिधीला जाब विचारताच त्यांनी प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा जुलै महिन्यापासून दर्जा सुधारला असल्याचे सांगितले. पण समाधान झाले नाही. त्यामुळे नागपूर मनपाच्या भांडेवाडी जलशुद्ध प्रकल्पाला भेट देवून सत्यस्थिती जाणून घेण्याचे ठरविण्यात आले.यावर्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविणार असल्यामुळे बुडीत क्षेत्रातील गावांचे स्थलांतर करण्याचे ठरविण्यात आले आहे. धरणाच्या लाभ क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना धरणाचे सिंचनाचे पाणी देण्यावर भर दिला जाणार आहे. पुनर्वसनस्थळी सर्व नागरी सुविधा पुरवून गावठाणे जि.प. हस्तांतरीत केले आहे. दर्जेदार पुनर्वसनाची काही कामे एनबीसी ला देण्यात आलेली आहे.
या कामांची पाहणी करून जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीने कामे प्रस्तावित करण्याचे ठरविण्यात आले आहे. गोसीखुर्द धरणाचे सौंदर्यीकरण करून याकरिता एक आराखडा तयार करण्याचे ठरविण्यात आले. धरणामध्ये वाढत असलेल्या इकॉर्निया वनस्पती निर्मूलन करण्याकरिता गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली कायमस्वरुपी उपाययोजना केली जाणार आहे. अनेक राहिलेल्या गावांचे पुनर्वसन केले जाणार आहे.
वाही वसाहत येथे झालेल्या या सभेत समितीचे अशासकीय सदस्य विलास भोंगाडे, विठोबा समरीत, गोविंद भेंडारकर, अधीक्षक अभियंता जे.एम. शेख, कार्यकारी अभियंता आर.एच. शर्मा, अभियंता रायपुरे, भंडारा व नागपूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी, नागपूर मनपाचे अधिकारी, वनविभाग, आरोग्यविभागाचे वरिष्ठ अधिकारी, शाखा अभियंता पी.डी. चवरे आदी उपस्थित होते.

Web Title: One of the basic issues that has been read in the meeting of the Environment Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.