महापुरुषांंचा वारसा पुढे नेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 09:56 PM2018-04-22T21:56:31+5:302018-04-22T21:56:31+5:30

बहुजन समाजाने महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे. सर्व महापुरुषांनी केलेले कार्य हे आपल्या समाजासाठी प्रेरणादायी व उर्जावान आहेत. त्यांच्या स्मृतींना आपण त्यांना शब्दरूपाने उजाळा देत आहोत.

The need to carry the legacy of great men ahead | महापुरुषांंचा वारसा पुढे नेण्याची गरज

महापुरुषांंचा वारसा पुढे नेण्याची गरज

Next
ठळक मुद्देदेशमुख यांचे आवाहन : सामाजिक सप्ताहाचा समारोप, पिपरी पुनर्वसन येथे संयुक्त जयंतीचा कार्यक्रम उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
शहापूर : बहुजन समाजाने महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे. सर्व महापुरुषांनी केलेले कार्य हे आपल्या समाजासाठी प्रेरणादायी व उर्जावान आहेत. त्यांच्या स्मृतींना आपण त्यांना शब्दरूपाने उजाळा देत आहोत. आजच्या चळवळीत तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून सामाजिक बांधिलकी जोपासणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा.मा.म. देशमुख यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पिपरी पुनर्वसन येथे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बहुजन नायक कांशीराम यांची संयुक्त जयंतीचा कार्यक्रम नवीन पुनर्वसन पिपरी येथे पार पडला. तसेच सामाजिक सप्ताहाचा समारोप करण्यात आला. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या प्रियाताई शहारे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते शशीकांत भोयर, अ‍ॅड.दिलीप बन्सोड, राजविलास गजभिये, डॉ.महेंद्र गणवीर, क्रिष्णा गजभिये, सुनिल उपरीकर, लिलाधर चवरे, सेवकदास चवरे, पेट्रोलपंप ठाणा येथील सरपंचा सुषमा पवार, पोलीस पाटील दिगांबर ठवकर, कचराबाई मेश्राम, रंजना बांगर, शिलवंत रंगारी, प्रा.दिलीप माने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बहुजन नायक कांशीराम यांना अभिवादन करून करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत गीत समीक्षा चवरे, उन्नती चवरे, नेहा, निकीता व संच आदींनी स्वागत गीत गाऊन अतिथींचे स्वागत केले.
प्रा.मा.म. देशमुख यांनी बहुजन समाजाची दशा आणि दिशा या विषयावर बोलून, तरुण वर्गाने बाबासाहेबांविषयी आदर ठेवून मोठ्या उत्साहात ज्याप्रमाणे जयंती साजरी करतात. त्याचप्रमाणे त्यांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून समाजात आदर्श निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. कांशीराम यांनी सामाजिक व राजकीय बांधिलकी जपत समाजातील अनेक जातींना एकसंघ जोडण्याचे मोठे धाडस करून दाखविले. आजच्या युगात विषमतावादी व्यवस्थेने आपल्या महापुरुषांचा खरा इतिहास कळू दिला नाही. हे बहुजन समाजाला खरे इतिहासापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र आहे. यासाठी समाजाने वेळीच जागे होऊन त्याचा प्रतिकार करण्याची गरज असल्याचे सांगितले.
शशीकांत भोयर यांनी सामाजिक चळवळ उभारताना अनेक असामाजिक लोक आपल्या कार्यात अडथळे आणण्याचे काम करतील पण त्यांना कार्यकर्त्यांनी खचून न जाता सतत आपले कार्य करावे, आपल्या कार्याला यश नक्कीच मिळणार या हेतूने महापुरुषांचे कार्य सतत समाजापर्यंत पोहचवून समाजजागृती करण्याचे काम सतत सुरु ठेवावे. प्रिया शहारे म्हणाल्या, महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दांपत्यांनी जे स्त्रियांना शिक्षणाचे हक्क दिले. त्या हक्कासाठी मोठा लढा उभारला ही बाब बहुजन समाज कधीही विसरू शकणार नाही. प्रास्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन नाशिक चवरे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप गायक मनोज कोटांगले यांच्या प्रबोधन भीमगीताने झाले. कार्यक्रमासाठी नितीन मेश्राम, जयंत चवरे, बाळकृष्ण चवरे, रेकचंद चवरे, कुंदा चवरे यांनी सहकार्य केले.

कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे जयंती उत्सव
भंडारा : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने संघटनेच्या जिल्हा कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवून जयंती समारोह उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण गाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयचे शल्य चिकित्सक डॉ.रवी धकाते, जिल्हा परिषद सदस्य नीळकंठ कायते, राज्य उपाध्यक्ष डॉ.विनोद भोयर, उपमहासचिव सूर्यभान हुमणे, राज्य महिला अध्यक्ष रजनी वैद्य, सल्लागार डॉ.मधुकर रंगारी, इंजि. दिनेश बोरकर, कृष्णा मसराम, सीताराम राठोड, रवी दांडेकर, गोपी भगत, नितीन जोशी उपस्थित होते. कार्यक्रमात अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारतीय राज्य घटनेविषयी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच आपल्या महापुरुषांनी आपल्याकरिता काय केले व समोर आपल्याला काय करायचे आहे, भारतीय राज्यघटनेला समोर ठेवूनच आपल्याला समोरची लढाई लढायची आहे. आपले हक्क आपणास मिळवून घ्यावयाचे आहेत. संघटन मजबूत करावे, संघटनेशिवाय कर्मचाऱ्यांना पर्याय नाही असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले. जयंती कार्यक्रमाकरिता जिल्हा अध्यक्ष विनय सुदामे, उपाध्यक्ष मधुकर रुषेश्वरी, सिद्धार्थ भोवते, युवराज रामटेके, मुकेश साकुरे, सैय्यद लियाकत अली, यशवंत उईके, युवराज देशभ्रतार, अतुल मेश्राम, हेमंत भांडारकर, मनिष वाहणे, अ‍ॅड.विलास कानेकर, देवानंद नागदेवे, सूर्यभान कलचुरी, अजय रामटेके, ओमप्रकाश उके, प्रभू ठवकर, दिनेश मेश्राम, नितीन शर्मा, नलिनी देशभ्रतार, कुंदा बोदलकर यांनी सहकार्य केले. संचालन प्रा.शिलवंतकुमार मडामे यांनी केले. विनोद मेश्राम यांनी याप्रसंगी कविता सादर केली. युवराज देशभ्रतार यांनी उत्स्फूर्तपणे असे गीत सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रा.अनमोल देशपांडे यांनी मानले.
 

Web Title: The need to carry the legacy of great men ahead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.