राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 10:07 PM2018-03-18T22:07:14+5:302018-03-18T22:07:14+5:30

लोकशाहीत राजकीय पक्षाची ताकद ही त्यांच्या कार्यकर्त्याच्या क्षमतेवर आहे. पक्षाचे ध्येय धोरण आणि पक्षाच्या सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत नेण्याचे खरे काम हे कार्यकर्ते करतात.

NCP's every worker is the particle of the party | राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा कणा

राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा कणा

Next
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल यांचे प्रतिपादन : वरठीत राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा

आॅनलाईन लोकमत
वरठी : लोकशाहीत राजकीय पक्षाची ताकद ही त्यांच्या कार्यकर्त्याच्या क्षमतेवर आहे. पक्षाचे ध्येय धोरण आणि पक्षाच्या सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत नेण्याचे खरे काम हे कार्यकर्ते करतात. राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाची ओळख असून त्यांच्या ताकदीच्या भरवश्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येऊ शकते. पदाधिकारी यांनी सामान्य कार्यकत्यार्ना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करावी. सामान्य कार्यकर्ता हा पक्षाचा कणाआहे, असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
वरठी येथे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या तालुका स्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत असताना त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका केली. सरकारच्या चुकीच्या धोरण अंमलबजावणीचा फटक्यांमुळे राज्यातील व्यवस्था व रोजगार संकटात आले असल्याचे सांगितले. चार वर्षात फक्त घोषणांची खैरात वाटून शेतकरी व शेतमजूर त्याबरोबर नौकरी वर्ग व व्यवसायिकीना काहीच मिळाले नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
यावेळी खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विस्वास ठेवून राष्ट्रवादी कांग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू कारेमोरे यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील २०० च्या जवळपास इतर पक्षातील कार्यकत्यार्नी पक्षात प्रवेश केला. कार्यकर्ता मेळाव्यात तालुक्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम सभागृहात जागा अपुरी पडल्यामुळे शेकडो कार्यकर्ते सभागृहाबाहेर उभे राहून प्रफुल पटेलचे भाषण एकात होते. २० मिनिटाच्या भाषणात त्यांनी अनेक मुद्यांना हात घालून मतदारांनी जात धर्मपलीकडे विचार करून मतदान करावे असे आवाहन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार अनिल बावनकर, जिल्हा अध्यक्ष मधुकर कुकडे, महिला जिल्हा अध्यक्ष कल्याणी भूरे, धनंजय दलाल, सरपंच स्वेता येळणे, तालुका अध्यक्ष संगीता सुखानी, राजू कारेमोरे, सदाशिव ढेंगे, नेरीचे सरपंच आनंद मलेवार उपस्थित होते.
यावेळी वरठीच्या सरपंच स्वेता येळणे यांनी पक्ष संघटनेत महिलांचा सहभाग वाढवून पक्षात काम करताना जिल्हा यंत्रणेकडून होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सवार्नी एकत्रित लढण्याचे आवाहन त्यांनी केले.
संचालन विजय पारधी, प्रास्ताविक राजू कारेमोरे व उपसरपंच सुमित पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला माजी सरपंच संजय मिरासे, रामेश्वर कारेमोरे , दिलीप गजभिये, माजी उपसरपंच मनोज सुखानी, अरविंद येळणे, ग्राम पंचायत सदस्य अतुल भोवते, संघरत्न ऊके, चेतन ठाकुर, ललिता बावणे, सीमा डोंगरे, मंदा साखरवाडे , विठ्ठल काहलकर, विशाल शेंडे, कैलास तितिरमारे, अनिल काळे, चेतन ठाकूर, वासुदेव बांते , किरण अतकरी आदी उपस्थित होते.

‘त्या’ कार्यकर्त्यांना पटेलांनी लगावला टोला
प्रफुल पटेल यांनी एकाच पक्षात राहून अनेक पक्षातील मेळाव्यात उपस्थित राहणाºया आणि ‘जाती साठी माती खाण्याचे’ धोरण पाळणाऱ्या कार्यकत्यार्ना खडे बोल सुनावले. दरवेळी आपण इकडे तिकडे उड्या मारतो आणि पुन: कामासाठी इकडे येणाऱ्या माणसांनी खुशाल जा पण इकडे येऊच नका असे सुनावले. यानंतर मी पण पूर्वी प्रमाणे राहणार नसून खऱ्या कार्यकर्त्यांचे काम होणार आणि दलबदलू माणसांना त्यांची जागा दाखवणार असे बोलून कान टोचले. त्यांच्या भाषणातून विरोधीसह पक्षातील काही उड्या बहाद्दरांना अप्रत्येक्ष टोला हाणल्याची चर्चा सुरु होती.

Web Title: NCP's every worker is the particle of the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.