नवतलावाच्या पाळीला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:19 PM2018-09-22T22:19:31+5:302018-09-22T22:19:59+5:30

Navatlava punar break | नवतलावाच्या पाळीला भगदाड

नवतलावाच्या पाळीला भगदाड

Next
ठळक मुद्देप्रशासनाची चूक : जांभोरा परिसरातील शेतकरी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील एलकाझरी येथील नवतलाव गट क्र. २८१ या तलावाच्या पाळीला भगदाड पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक धोक्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, एलकाझरी येथील नवतलावाचा देखरेख स्टेट लघुपाटबंधारे विभागाकडे आहे. नवतलावाच्या पाळीला छोटासा छिद्र पडला होता याची माहिती वरीष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली परंतु याकडे या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने तलावाची पाळ फुटण्याची वेळ आली आहे. मोठा भगदाड पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतपिकाला पाणी न झाल्यास हातातील पिक जाण्याची वेळ आली आहे.
शेतकºयांचा पिकाचा नुकसान झाल्यास या लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याकडून वसुली करण्याची मागणी शेतकºयांनी केली. वेळीच दखल घेतली असती तर आज तलावाची पाळ फुटण्याची वेळ आली नसती. राज्य लघुपाटबंधारे विभागाच्या आळशी अधिकाऱ्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाला आहे.
या गेटचा दोन तीन वर्षाअगोदर काम करण्यात आला. मात्र काय अत्यंत निकृष्ठ दर्जाचा असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. भगदाड पडण्याची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आल्यावर सुध्दा हे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देवून शेतकºयांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Navatlava punar break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.