प्लोअर बॉल स्पर्धा : शास्त्री विद्यालयाचे खेळाडू
भंडारा : छत्तीसगढ राज्यातील राजनांदगाव येथे झालेल्या फ्लोअर बॉल राष्ट्रीय स्पर्धेत भंडाऱ्यातील दोन खेळाडूंनी सुवर्ण पदक प्राप्त केले. जयेश उमेश क्षीरसागर व गिरीष राजू भोयर अशी खेळाडूंची नावे असून ते दोघेही लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे भंडाराचे इयत्ता ८ वी चे विद्यार्थी आहेत.
क्षीरसागर व भोयर याची अहमदनगर येथे झालेल्या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झालेली होती.
राजनांदगाव येथे चमकदार कामगिरी दाखवित महाराष्ट्राच्या वाट्याला दोन सुवर्ण पदक प्राप्त करून दिले. या यशामुळे फ्लोअर बॉल स्पर्धेच्या निमित्ताने भंडारा जिल्ह्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांचे लोकप्रतिनिधीसह नागरिकांनी कौतुक केले आहे. यशस्वी खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, प्राचार्य डी.व्ही. देशमुख, क्रीडाशिक्षक सुनिल खिलोटे यांना दिले आहे. शाळेच्या वतीने या दोन्ही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)