राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:49 PM2019-01-21T22:49:35+5:302019-01-21T22:49:49+5:30

बहूजन प्रबोधन मंचच्या वतीने राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन लाखांदूर येथे २६ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. उद्घाटन लखनौ विद्यापिठाचे डॉ. डी.एन.एन. एस. यादव यांच्या हस्ते होईल. तर संमेलनाध्यक्षपदी घटनातज्ज्ञ अ‍ॅड. दिलीप काकडे राहतील.

National Constitution Literature Conference | राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन

राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन

googlenewsNext
ठळक मुद्देलाखांदूर येथे प्रजासत्ताकदिनी आयोजन : विविध विषयांवर होणार मंथन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बहूजन प्रबोधन मंचच्या वतीने राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन लाखांदूर येथे २६ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. उद्घाटन लखनौ विद्यापिठाचे डॉ. डी.एन.एन. एस. यादव यांच्या हस्ते होईल. तर संमेलनाध्यक्षपदी घटनातज्ज्ञ अ‍ॅड. दिलीप काकडे राहतील.
लाखांदूर येथील आर्शिवाद मंगल कार्यालय परिसरात उभारलेल्या महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्य नगरीत दुपारी १ वाजता उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला मार्गदर्शक म्हणून लेखक संजय आवटे, माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंत पुरके, लाखांदूरचे नगराध्यक्ष भाऊराव दिवटे राहतील. यावेळी डॉ. अल्का दहीलकर, मुरलीधर मेश्राम, सोनदास गणवीर, निलकंठ प्रधान, तुकाराम तुमराम यांचा सत्कार करण्यात येईल.
द्वितीय सत्रात सायंकाळी ६ वाजता कवी संमेलन होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे राहतील. यात नामदेव कान्हेकर, सी. के. लेंडारे, मुन्ना नंदागवळी, प्रा. अशोक डहाके, प्रा. जी. एस. रामटेके, प्रा. एन. आर. डेकाटे, प्रा. नलिनी चहांदे, निलीमा रंगारी होतील. रात्री ८ वाजता समाजप्रबोधनपर गटार नाटीकेचे आयोजन करण्यात आले आहे.
या नाटीकेचे लेखन विरेंद्र गणविर यांनी केले असून बहुजन रंगभूमी नाटीका सादर करणार आहे. यावेळी लाखांदूरचे ठाणेदार निशांत मेश्राम, माजी नगराध्यक्ष निलम हुमणे, स्टेट बँकेचे व्यवस्थापक विलास रिनायत, मेघशाम कुरकुटे, योगेश कुटे उपस्थित राहणार आहे. या स्नेहसंमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन बहूजन प्रबोधन मंचचे अध्यक्ष अनिल कानेकर यांनी केले आहे. प्रजासत्ताक दिनी लाखांदूरकरांना वैचारिक मेजवाणी लाभणार आहे.

Web Title: National Constitution Literature Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.