भंडारा जिल्ह्यात कोका अभयारण्यामुळे पर्यटनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:36 PM2017-11-14T13:36:59+5:302017-11-14T13:41:55+5:30

जिल्ह्यात असलेल्या भंडारा तालुक्यातील कोका अभयारण्य पर्यटकांना भुरळ पाडू लागला आहे. मागील काही दिवसात येथील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने वनविभागाच्या महसुलात वाढ होत आहे.

Moving tourism due to the Coca Wildlife Sanctuary in Bhandara District | भंडारा जिल्ह्यात कोका अभयारण्यामुळे पर्यटनाला चालना

भंडारा जिल्ह्यात कोका अभयारण्यामुळे पर्यटनाला चालना

Next
ठळक मुद्देडबल सफारीचा आनंद४६ किमीचा सफारीचा मार्ग

आॅनलाईन लोकमत
भंडारा : महाराष्ट्राच्या नकाशावरील अगदी पूर्वेकडच्या कोपऱ्यात असणारा भंडारा जिल्हा ११ लाखांच्यावर लोकसंख्या आहे. नैसर्गिक सौंदर्यासोबतच, नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असा हा जिल्हा आहे. एवढ्या छोट्या जिल्ह्यात भौगोलिक क्षेत्रापैकी १/३ क्षेत्र जंगलाने व्यापलेला आहे. या जिल्ह्यात असलेल्या भंडारा तालुक्यातील कोका अभयारण्य पर्यटकांना भुरळ पाडू लागला आहे. मागील काही दिवसात येथील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने वनविभागाच्या महसुलात वाढ होत आहे.
भंडारा - गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या न्यू नागझिरा व नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या १० हजार १३ हेक्टर वनक्षेत्र शासनाने २०१३ मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्याला कोका अभयारण्य असे नाव देण्यात आहे. ब्रिटीश काळात ‘ओल्ड रिझर्व्ह फॉरेस्ट’ म्हणून जे जंगल ओळखले जात होते त्याच भागाला आता अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे.
अभयारण्यातील प्राणी येथील पर्यटकांसाठी आकर्षक ठरले आहे. यासोबतच येथील निसर्गसानिध्याची भुरळ पर्यटकांना कोका अभयारण्यात वारंवार येण्यासाठी आकर्षित करीत आहे. हे अभयारण्य वन्यजीवांसाठी उत्कृष्ट अधिवास असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या जंगलाला वन्यप्राण्यांसाठी संरक्षित केले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात वाघ, बिबट, गवा, अस्वल, काळवीट, निलगाय, सांबर, रानकुत्रे, चितळ, रानडुक्कर आदींचा अधिवास आहे. त्याचबरोबर अनेक पक्ष्यांच्या अधिवासाने व जैवविविधतेने येथील निसर्ग सानिध्य नटलेला आहे.
या अभयारण्याचा विकास डिसेंबर २०१३ पासून सुुरु झाला. येथे २५ नैसर्गिक पाणवठे आहेत. ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध नाही त्या ठिकाणी विंधन विहिरी बांधण्यात आल्या असून पाणी पिण्यासाठी सिमेंट टाकी तयार करण्यात आली आहे. टाकीत सतत पाणी राहावे म्हणून सौर उर्जेवर चालणारे पंप बसविण्यात आले आहे. या अभयारण्यात जाण्यासाठी चंद्रपूर या गावी प्रवेशद्वार करण्यात आले आहे. पर्यटकांना जंगल सफारीसाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातीलच १२ वी पास विद्यार्थ्यांना येथील पर्यटकांना गाईड करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
अभयारण्यातील डबल सफारीचा मार्ग ४६.५ कि.मी. चा आहे. या अभयारण्यात वन्यप्राण्यांचे दर्शन सातत्याने होत असल्यामुळे पर्यटकांचा ओढा या अभयारण्याकडे वाढत आहे.
अभयारण्यासाठी मार्ग
नागपूर - भंडारा हे ६५ कि.मी. चे अंतर असून भंडाऱ्याहून चंद्रपूर हे प्रवेशद्वार १९ कि.मी. चे आहे. चंद्रपूर प्रवेशद्वारापासून तीन जिप्सीची व्यवस्था आहे. तसेच स्वत:चे वाहनही जंगल सफारीसाठी वापरता येते. या जंगल सफारीची वेळ पहाटे ५ ते सकाळी ९.३० पर्यंत आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६.४५ पर्यंत ठरविण्यात आली आहे.
आॅनलाईन बुकींग
अभयारण्याला भेट देण्यासाठी आॅनलाईन बुकींगची व्यवस्था आहे. तसेच स्पॉट बुकींग चंद्रपूर प्रवेशद्वारावर उपलब्ध आहे. एकावेळी पाच ते सात गाड्या सोडण्यात येतात. येथे पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. अभयारण्यात इको डेव्हलपमेंट कमीटीचे दोन टेंट आहेत. यामध्ये निवास व भोजनाची व्यवस्था आहे.

Web Title: Moving tourism due to the Coca Wildlife Sanctuary in Bhandara District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.