लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : समर्थनगर लाखनीच्या साई मंदिर परिसरातून जागतिक योग दिनानिमित्त सर्वत्र जनजागृती करण्यासाठी सावरी, मुरमाडी लाखनी गावातून मोटारसायकल रॅली आज सकाळी ७ वाजता काढण्यात आली
पतंजली योग समिती लाखनी, भारत स्वाभिमान समिती, महिला पतंजली योग समितीच्या वतीने जागतिक योग दिनाबद्दल जनतेत उत्सुकता निर्माण करणे आरोग्य उत्तम राहण्यासाठी योगाचे महत्व व स्थान आदी गोष्टीची जागृती समाजात व्हावी यासाठी या पतंजली योग समितीच्या वतीने आज सोमवारला सकाळी ७ वाजता समर्थनगर लाखनी येथील साई मंदिर प्रांगणातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
या रॅलीचे नेतृत्व योग प्रशिक्षक सुनिल भाग्यवानी, प्रा. धनंजय गिऱ्हेपुंजे, सुधिर बावनकुळे, अनिल निर्वाण, पद्माकर सावरकर, रिता निर्वाण, प्रणाली सावरकर, कविता मोलगीरे, निशा गायधनी व अन्य योग प्रेमिंनी या रैलीत सहभाग घेतला.
योग दिनानिमित्त विविध ठिकाणी योग वर्ग घेतले जाणार असल्याची माहिती पतंजली योग समितीच्या वतीने देण्यात आली. या योग दिनाला लाखनी शहरासह परिसरातील गावांमधील शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.