लाखनीत घनकचरा व्यवस्थापन अद्यापही बाल्यावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:38 AM2019-05-20T00:38:18+5:302019-05-20T00:38:36+5:30

येथे नगर पंचायतीची निर्मिती होऊन चार वर्षे झाली तरी घनकचरा व्यवस्थापन अद्यापही बाल्यावस्थेतच आहे. नगर पंचायतीकडे स्वत:चा मालकीचे डम्पिंग यार्डही नाही. त्यामुळे ओला व सुका कचरा लाखोरी रोडवर टाकला जातो. परिणामी संजय नगर, संताजी मंगल कार्यालय परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

Loneliness Solid Waste Management Still In Childhood | लाखनीत घनकचरा व्यवस्थापन अद्यापही बाल्यावस्थेत

लाखनीत घनकचरा व्यवस्थापन अद्यापही बाल्यावस्थेत

googlenewsNext
ठळक मुद्देडम्पिंग यार्डचा अभाव : रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे, दुर्गंधीने आरोग्य धोक्यात

चंदन मोटघरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : येथे नगर पंचायतीची निर्मिती होऊन चार वर्षे झाली तरी घनकचरा व्यवस्थापन अद्यापही बाल्यावस्थेतच आहे. नगर पंचायतीकडे स्वत:चा मालकीचे डम्पिंग यार्डही नाही. त्यामुळे ओला व सुका कचरा लाखोरी रोडवर टाकला जातो. परिणामी संजय नगर, संताजी मंगल कार्यालय परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.
नगर पातळीवर कचरा व्यवस्थापनाचे नियोजन, कचरा वर्गीकरण, कचरा गोळा करणे, त्याची विल्हेवाट आदी बाबींवर लक्ष केंद्रीत करावे लागते. संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत एकुण निधीच्या दहा टक्के रक्कम घनकचरा व्यवस्थापनावर वापरता येते. घनकचºयाचे निर्मुलन करताना कचरा निर्मितीच्या जागा व त्यानुसार व्यवस्थेचा विचार केला जातो. घनकचरा सार्वजनिक जागीही निर्माण होतो. दुकाने आठवडी बाजार, शाळा, मंदिर, लग्नसमारंभ आदी ठिकाणी भरपूर केरकचरा निर्माण होतो. घनकचराची निर्मिती घराघरातून होत असल्याने गोळा होणारे घनकचराचे प्रमाण व त्याचा दर्जावर नियंत्रण ठेवता येत नाही. परिणामी त्याची साठवण, वाहतुक व्यवस्था व त्यावरिल प्रक्रियेचे डिझाईन लाखनी नगर पंचायतीजवळ तयार नाही.
लाखनी नगरपंचायतीने कोट्यवधीचा निधी सिमेंट रस्ते, नाल्या तयार करण्यावर खर्च केला आहे. शासन स्वच्छता मोहीमेवर भर देत आहे. परंतु नगर पंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे. या कचºयामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा टाकला जातो त्या परिसरातील नागरिकांना राहणे कठीण झाले आहे.
नगरसेवक धनु व्यास म्हणाले, शहरापासून सात-आठ किलोमिटर अंतरावर डम्पिंग यार्ड असण्याचा नियम आहे. काही लोक हेतुपरस्सर कचºयाच्या ढिगाºयाला आग लावतात. नगर पंचायत स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाकडे लक्ष पुरवित आहे.

डम्पिंग यार्डच्या जागेचे भिजत घोंगडे
लाखनी नगरपरिषदेला घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन ते पाच एकर जमीन हवी आहे. शहराच्या आसपास एवढीमोठी शासकीय जमीन उपलब्ध नाही. त्यामुळे खाजगी जमीन विकत घेण्याची निविदा काढण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात गेला आहे. जमीन खरेदी-विक्रीचा प्रस्तावाला अंतीम रुप मिळाले नाही. लाखनीची लोकसंख्या १२ हजार आहे. प्रत्येक प्रभागात कुंड्या आहेत. गल्लोगल्लीत कचरा गोळा करण्याचे डब्बे आहेत. घराघरात प्रत्येक कुटूंबाला डस्टबिन दिले आहेत. परंतु गोळा झालेल्या कचºयाचे काय करावे हा नेमका प्रश्न आहे.

Web Title: Loneliness Solid Waste Management Still In Childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dumpingकचरा