Lok Sabha Election 2019; मतदानाचा टक्का घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:00 PM2019-04-12T22:00:29+5:302019-04-12T22:01:28+5:30

लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसत आहे. ११ एप्रिल रोजी १२ लाख ३४ हजार ८९६ म्हणजे ६८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ मध्ये ७२.२१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Lok Sabha Election 2019; Voting percentage dropped | Lok Sabha Election 2019; मतदानाचा टक्का घसरला

Lok Sabha Election 2019; मतदानाचा टक्का घसरला

Next
ठळक मुद्दे६८.२७ टक्के मतदान : २०१४ च्या तुलनेत ३.९४ टक्के घट, सर्वाधिक साकोलीत मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसत आहे. ११ एप्रिल रोजी १२ लाख ३४ हजार ८९६ म्हणजे ६८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ मध्ये ७२.२१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यंदा त्यात ३.९४ टक्के घट दिसून येत आहे. मतदानाची घटलेली टक्केवारी कुणाला तारणार? यावर सध्या गावागावात चर्चा सुरू आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात १८ लाख ८ हजार ७३४ मतदारांपैकी १२ लाख ३४ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ६ लाख २६ हजार ७४९ पुरूष आणि ६ लाख ८ हजार १४७ मतदारांचा समावेश आहे. सर्वात कमी ६४.४१ टक्के मतदान गोंदिया विधानसभा क्षेत्रात तर सर्वाधिक ७१.६५ टक्के मतदान साकोली विधानसभा क्षेत्रात झाले.
२०१४ च्या मतदानाच्या टक्केवारीच्या तुलनेत ३.९४ टक्के यंदा घट आल्याचे दिसून येत आहे. २०१४ मध्ये १६ लाख ५२ हजार २८३ मतदारांपैकी ११ लाख ९३ हजार १२५ म्हणजे ७२.२१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ३.९४ टक्के मतदानात घट दिसून येत आहे. मतदानाचा घसरलेला टक्का कुणाला फायद्याचा ठरणार, यावर सध्या गावागावात सध्या चर्चा सुरू आहे. कोणत्या विधानसभा क्षेत्रात कोणाला कसे मतदान मिळाले, यावर घमासान सुरू असून कोण जिंकणार आणि कोण हरणार याचीच चर्चा होत आहे.
प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली होती. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. सखी आणि आदर्श मतदान केंद्र स्थापन करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतरही मतदानाच्या टक्केवारीत अपेक्षित वाढ झाली नाही. उन्हाचा तडाख्याने मतदानात घट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत ६९.२३ टक्के पुरूषांनी तर ६७.३१ टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ९ लाख ५२ हजार पुरूष मतदारांपैकी ६ लाख २६ हजार ७३९ मतदारांनी तर ९ लाख ३ हजार ४६० महिला मतदारांपैकी ६ लाख ८ हजार १४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
गोंदिया विधानसभाक्षेत्रात सर्वात कमी मतदान
सहा विधानसभा क्षेत्रापैकी सर्वात कमी मतदान गोंदिया विधानसभा क्षेत्रात झाले. येथे ६४.४१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर सर्वाधिक मतदान साकोली विधानसभा क्षेत्रात ७१.६५ टक्के झाले. तुमसरमध्ये ७०.२६ टक्के, भंडारा ६५.६७ टक्के, अर्जुनी मोरगाव ७१.४१ टक्के, तिरोडा ६७.०८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
भंडारा जिल्ह्यात ६९.२२ तर गोंदियात ६७.६३ टक्के
भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रातील सात तालुक्यात ६९.२२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ६७.६३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गोंदिया विधानसभा क्षेत्रात लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले.

Web Title: Lok Sabha Election 2019; Voting percentage dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.