कालव्यात पडलेल्या सांभराला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 10:28 PM2018-01-19T22:28:39+5:302018-01-19T22:29:21+5:30

पाण्याच्या शोधार्थ आलेले एक सांभर गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडली. यात त्या सांभराला वाचविण्यात वनविभागाला यश आले.

Livelihood in the canal | कालव्यात पडलेल्या सांभराला जीवदान

कालव्यात पडलेल्या सांभराला जीवदान

Next

आॅनलाईन लोकमत
पवनी : पाण्याच्या शोधार्थ आलेले एक सांभर गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडली. यात त्या सांभराला वाचविण्यात वनविभागाला यश आले. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.
सांभर कालव्यात घसरुन पडल्याची माहिती वनविभागाला होताच वनविभागाचे कर्मचाºयांनी घटना स्थळी पोहचून वन्यप्रेमींच्या मदतीने कालव्यात पडलेल्या सांभराला तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर काढण्यात वनविभागाला यश आले.
दुपारी एक वाजताचे दरम्यान बेलघाटा वॉर्डाला लागून असलेल्या कालव्याच्या पुलाजवळ सांभर पडल्याची माहिती गावकºयांना मिळाली. परिणामी कालव्याच्या पाळीवर बघ्यांची गर्दी उसळली. वनविभागाच्या कर्मचाºयांनी दोरखंड, जाळी व इतर साहित्य घेवून कालव्याकडे धाव घेतली. दोर व जाळीच्या सहायाने मदतीने सांभराला कालव्याच्या बाहेर काढण्यास सुरुवात केली. मात्र गावकºयांच्या गर्दी व गोंगाटामुळे दोनदा पाण्याबाहेर काढलेले सांबर पुन्हा कालव्यात कोसळले. सांभराला बहेर काढणाºया वनविभागाच्या कर्मचाºयांना व वन्यप्रेमींना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. प्रयत्नानंतर अखेर सांभराला पाण्याचे बाहेर काढून जेरबंद केले. त्याला उमरेड - पवनी- कºहांडला अभयारण्याच्या गायडोंगरी तलाव परिसरात सोडण्यात आले. सदर रेस्क्यु आॅपरेशनात वनविभागाचे वनपाल डी. टी. नंदेश्वर, कोरंभीचे वनरक्षक किशोर कोहाट, वनरक्षक मारोती केंद्रे , सारंग शिंदे वनरक्षक, पी. व्ही. शिंदे, भानुप्रतापसिंह तोमर, रामचंद्र कुर्झेकर अशोक बोरकर, महादेव शिवरकर, संघरत्न धारगावे, मयुर रेवतकर, विपीन तलमले, महेंद्र नागले, पंकज पचाल, समिर चव्हाण, आकाश दहिवले, पंकज दहिवले, पंकज तलमले, छगन डाहारे, दिनेश डाहारे, उमेश शेंडे, सतिश जांभुळकर आदींनी राबविले.

Web Title: Livelihood in the canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.