जीवनदायीनी वैनगंगा दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:43 AM2019-07-15T00:43:56+5:302019-07-15T00:44:30+5:30

जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीचे पाणी नागनदीच्या सांडपाणी व जलजन्य वनस्पतींमुळे दिवसेंदिवस दूषित होत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आता नदीच्या स्वच्छतेसाठी कोण पुढाकार घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.

Life partner Vainganga Corrupted | जीवनदायीनी वैनगंगा दूषित

जीवनदायीनी वैनगंगा दूषित

Next
ठळक मुद्देआरोग्याला धोका : नदी स्वच्छतेसाठी कोण घेणार पुढाकार?

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीचे पाणी नागनदीच्या सांडपाणी व जलजन्य वनस्पतींमुळे दिवसेंदिवस दूषित होत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आता नदीच्या स्वच्छतेसाठी कोण पुढाकार घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.
वैनगंगा नदीच्या काठावर गोसेखुर्द सिंचन प्रकल्प बनविण्यात आला आहे. दूषित पाण्यामुळे आतपर्यंत शुद्ध असलेल्या पाण्याने रंग बदलला आहे. याचा परिणाम भंडारावासियांना जाणवू लागला आहे.
आरोग्य आणि पाणी पुरवठा विभागाने यासंबंधी राज्य सरकारला पाठविलेल्या अहवालात नागपूरच्या नाग नदीचे दूषित पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत असल्यामुळे पाणी दूषित झाल्याचे म्हटले आहे. तरीसुद्धा राज्य सरकारने ही समस्या गंभीरतेने घेतलेली नाही. नाग नदीसोबतच भंडारा शहरातील सांडपाणीसुद्धा वैनगंगा नदीला येऊन मिळत आहे. गोसेखुर्दमध्ये वैनगंगेचा प्रवाह थांबला आहे.
परिणामी दूषित पाणी वाहून जात नाही. परिणामी या दूषित पाण्याच्या उपयोगामुळे नागरिकांना चर्म विकार जडले आहेत.
याशिवाय पोटाचे विकार फुफ्फुस आणि श्वसनाचे आजार बळावत आहेत. याला मुख्य कारण वैनगंगा नदीचे दूषित पाणी असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे ईकॉर्नियाची समस्येमुळे त्यात अधिक भर पडली आहे.
भंडारा, पवनी तालुक्यातील गावे प्रभवैनगंगा नदीच्या दूषित पाण्यामुळे प्रभावित झालेल्या नदी काठावरील गावांची निवड शुद्ध पाणीपुरवठ्याकरीता करण्यात आली आहे.
भंडारा व पवनी तालुक्यातील या गावांमधील पाण्याचे नमुने फार पूर्वी तपासणीसाठी पाठविण्यातही आले होते. त्यात नदीचे पाणी दूषित असल्यामुळे ते पिण्यायोग्य नसल्याचे सांगून जलशुद्धीकरणानंतर पाण्याचा पुरवठा केला पाहिजे, असेही अहवालात नमूद आहे.
मत्स्योत्पादनही घटले
वैनगंगेचा प्रवाह थांबल्यामुळे त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. नदीचे दूषित पाणी केवळ मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत असतानाच जलचर प्राण्यांसाठी घातक ठरत आहे. वैनगंगा नदीतील मासोळ्याची दूरवर मागणी होती. परंतु नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे मासे मृत्यूमुखी पडत आहेत. माशांची प्रजननक्षमता घटल्यामुळे त्याचा परिणाम मत्स्योत्पादनावर झाला असल्याचे दिसून येते.

Web Title: Life partner Vainganga Corrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी