कावळ्यांच्या घरट्यांनी दिले कमी पावसाचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 10:15 PM2019-06-12T22:15:45+5:302019-06-12T22:16:11+5:30

पशु-पक्षी निसर्गात होणारे बदल लवकर टिपतात. त्यानुसारच वर्तनही करतात. पूर्वी हवामानाचा अंदाज सांगणारे यंत्रणा नव्हती. त्यावेळी पशु-पक्षांच्या विशिष्ट हालचालीवरुन पावसाचा अंदाज बांधला जाता होता. कावळ्याच्या घरट्यावरुन पाऊस यंदा कशा पडणार याचे संकेत मिळत होते.

Less rain signs given by Kavalis nests | कावळ्यांच्या घरट्यांनी दिले कमी पावसाचे संकेत

कावळ्यांच्या घरट्यांनी दिले कमी पावसाचे संकेत

Next
ठळक मुद्देघरटे वृक्षांच्या शेंड्यावर : पक्षी निरीक्षकांचा अंदाज

संजय साठवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : पशु-पक्षी निसर्गात होणारे बदल लवकर टिपतात. त्यानुसारच वर्तनही करतात. पूर्वी हवामानाचा अंदाज सांगणारे यंत्रणा नव्हती. त्यावेळी पशु-पक्षांच्या विशिष्ट हालचालीवरुन पावसाचा अंदाज बांधला जाता होता. कावळ्याच्या घरट्यावरुन पाऊस यंदा कशा पडणार याचे संकेत मिळत होते. आजही पक्षी निरीक्षक कावळ्याने घरटे वृक्षाच्या कोणत्या भागात बांधले यावरुन पावसाचा अंदाज लावतात. यंदा कावळ्याने वृक्षाच्या अगदी शेंडावर घरटी बांधल्याने कमी पावसाचे संकेत पक्षी निरीक्षकांनी दिल्या.
पुरातन काळापासून ग्रामीण भागात कावळ्याला पावसाचे संकेत देणारा पक्षी समजला जातो. मात्र दिवसेंदिवस कावळ्यांची संख्या कमी झाल्याने त्यांची घरटी शोधावी लागतात. पूर्वी हवामान खाते नसल्याने देशी उपाय योजना व अंदाजावर अवलंबून राहावे लागत होते. काळानुसार विज्ञानाने प्रगती केली असली तरी पावसाच्या बाबतीत अनेकदा हवामान खात्याचा अंदाज चुकतो. मात्र पक्षांचा अंदाज खरा निघतो. वराहमिहिर, पाराशर, गर्ग या विज्ञाननिष्ठ पूर्वसुरींनी कावळ्याच्या घरटी बांधण्याच्या निरीक्षणावरुन पावसाचा अंदाज बांधला. बोर, बाभूळ, हिवर, सावर यासारख्या काटेरी झाडावर कावळ्यांची घरटी आढळल्यास अवर्षणाची भीती असते. आंबा, निंब, अर्जुन, करंज, चिंच यासारख्या झाडावर घरटी केल्यास चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. शिवाय कावळ्याची घरटी झाडाच्या शेंड्यावर आढळल्यास अवर्षणाची नांदी असल्याचे सांगण्यात आले आहे. पक्षीनिरीक्षक विनोद भोवते यांनी साकोली परिसरातील झाडावर बांधलेल्या कावळ्याच्या घरट्यांचे निरीक्षण केले. त्यांना यावर्षी कावळ्याची घरटी झाडाच्या शेंड्यावर बांधलेले आढळली. कावळा सहसा झाडाच्या शेंड्यावर घरटी बांधत नाही, हे विशेष. शेंड्यावरील कावळ्याची घरटी म्हणजे अत्यल्प पावसाचे संकेत समजले जाते.

मानवाचे संपूर्ण जीवनमान निसर्गावर अवलंबून असते. मात्र माणूस निसर्गाची छेडछाड करीत आहे. स्वार्थासाठी दिवसेंदिवस जंगलतोड वाढत चालली आहे. याचा परिणाम निसर्ग चक्रावर होत आहे. यंदा कमी पाऊस असल्याचे संकेत साकोली तालुक्यात कावळ्यांनी वृक्षांच्या शेंडावर बाधंलेल्या घरट्यांवरुन बांधता येतो.
- विनोद भोवते
पक्षी निरीक्षक साकोली

Web Title: Less rain signs given by Kavalis nests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस