विकासकामात राजकारण दूर ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 10:36 PM2018-01-20T22:36:07+5:302018-01-20T22:36:41+5:30

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तुमसर नगर परिषदेने देशात ४० व्या क्रमांकावरून १५ व्या स्थानी भरारी घेतली. पुन्हा १५ दिवस वेळ आहे.

Keep politics away from development | विकासकामात राजकारण दूर ठेवा

विकासकामात राजकारण दूर ठेवा

Next
ठळक मुद्देना.महादेव जानकर : तुमसर नगर परिषद देशात १५ व्या क्रमांकावर

आॅनलाईन लोकमत
तुमसर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तुमसर नगर परिषदेने देशात ४० व्या क्रमांकावरून १५ व्या स्थानी भरारी घेतली. पुन्हा १५ दिवस वेळ आहे. प्रथम क्रमांकावर येण्याकरिता सामूहिक प्रयत्न करा. विकासकामातून राजकारणाला दूर ठेवा. पश्चिम महाराष्ट्रात विकासासाठी विरोधी व सत्ताधारी पक्ष एकत्र येतात. प्रगतीसाठी हे सूत्र महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले.
तुमसर नगरपरिषदेला ना.महादेव जानकर यांनी शनिवारला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी नगराध्यक्ष, नगरसेवक, पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी आ.चरण वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपाध्यक्ष कांचन कोडवानी, मुख्याधिकारी अर्चना मेंढे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी उपस्थित होते.
यावेळी ना. जानकर म्हणाले, मानव विकास निर्देशांकात तुमसरचा समावेश करण्यात आला आहे. त्यात राज्यातील २५ तालुक्यांचा समावेश आहे. नगर परिषदेने दरडोई उत्पन्नाचे सर्व्हेक्षण करावे. त्यामुळे बेरोजगार महिला, पुरूषांची माहिती होईल. त्यानुसार उपाययोजना करता येईल. शासनाकडून भरपूर निधी मिळतो. त्याचा लाभ स्थानिकांना होईल. तुमसर विधानसभा क्षेत्रात फिरते पशुचिकित्सक मंजूर करण्यात आले आहे. राज्यात प्रथम तुमसरला हा मान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छता उपक्रमांचे ना. जानकर यांनी समाधान व्यक्त केले.
आ.वाघमारे यांनी विविध विषयावर मत व्यक्त केले. यावेळी सभापती रजनीश लांजेवार, मेहताबसिंग ठाकूर, नगरसेवक किशोर भवसागर, गीता कोंडेवार, श्याम धुर्वे, प्रमोद घरडे, राजा लांजेवार, कैलास पडोळे, राजू गायधने, सचिन बोपचे, भारती धार्मिक, अर्चना भुरे, सुनिल पारधी, शिला डोये, विकास लांजेवार, पंकज बालपांडे, गौरव नवरखेले, डॉ.गोविंद कोडवानी, ललीत शुक्ला, अनिल जिभकाटे, मतीनभाई, योगेश रंगवानी, वहीदखान, सुनिल मेश्राम, मुन्ना फुंडे, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी उपस्थित होते.

Web Title: Keep politics away from development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.