दूषित पाणी पुरवठ्याने बळावले आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:09 PM2018-06-20T22:09:19+5:302018-06-20T22:10:08+5:30

भंडारा शहरात मागील पाच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होत असताना याचा दूरगंभीर परिणाम जाणवू लागला आहे. दूषित पाण्याने नागरिकांना अनेक आजार उद्भवू लागले असून या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अजूनपर्यंत सुरु झालेले नाही.

Illness affected by contaminated water supply | दूषित पाणी पुरवठ्याने बळावले आजार

दूषित पाणी पुरवठ्याने बळावले आजार

Next
ठळक मुद्देपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : लिकेज शोधूनही सापडेना, वाढीव पाणीपुरवठा योजेनेचे कामही सुरू होईना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा शहरात मागील पाच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होत असताना याचा दूरगंभीर परिणाम जाणवू लागला आहे. दूषित पाण्याने नागरिकांना अनेक आजार उद्भवू लागले असून या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अजूनपर्यंत सुरु झालेले नाही.
हाकेच्या अंतरावर बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीपात्रातून पावणेदोन लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहराला पाणी पुरवठा नगरपालिकेच्या माध्यमातून केला जातो.
शहरात १० हजारांच्या वर घरगुती नळधारक असून ३०० च्या वर सार्वजनिक नळजोडणी आहेत. दिवसेंगणिक नळधारकांची संख्याही वाढत असताना दूषित पाण्याच्या समस्येवर अजूनपर्यंत कायमस्वरुपी तोडगा निघालेला नाही.
‘फॉल्ट’ शोधूनही सापडत नसल्याने पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे भंडारा शहरातील नळाच्या उपयोगीतेवर असलेल्या नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. यात त्वचेचे व पोटाचे विकार बळावले आहेत.
शुद्ध पाण्याचा गोरखधंदा
दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे अनेकांनी पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाणी विकत घेण्याकडे कल वाढविला आहे. अनेकांनी नळाचे पाणी पिणे बंद केले आहे. मात्र बाहेरील वापरासाठी नळाचे पाणी वापरले जाते. परिणामी त्वचेचे आजार होत असल्याची बाब समोर येत आहे. दुसरीकडे भंडारा शहरात ठिकठिकाणी पाच रुपयात २० लिटर पाणी देण्याचे केंद्र सुरु झाल्याने व दुसरीकडे पालिका तर्फे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने शुद्ध पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. या व्यवसायाला कुणाचीही सक्ती नसली तरी पालिका प्रशासनाची जबाबदारी शुद्ध पाणी पुरवठ्याची असताना याबाबत पालिका प्रशासन धीरगंभीर दिसत नाही.
ठिकठिकाणी येते काळेकुट्ट पाणी
शहरातील बहुतांश भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यात काही ठिकाणी काळेकुट्ट पाणी तर काही ठिकाणी फेसाळयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. काही वॉर्डात तर रसायनयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याची बाबही समोर आली आहे. याबाबत नागरिकांनी स्वत: पालिका कार्यालयात जाऊन अधिकाºयांसह पदाधिकाऱ्यांना ही बाब कळविली आहे. मात्र यावर अजूनपर्यंत तोडगा निघालेला नाही.

Web Title: Illness affected by contaminated water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.